Home गडचिरोली केरला मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सुष्मीत कौर जिल्ह्यात द्वितीय

केरला मॉडेल स्कूलची विद्यार्थिनी सुष्मीत कौर जिल्ह्यात द्वितीय

93

– ९६.८० टक्के गुण केले प्राप्त

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली येथील ग्लोबल मीडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेची विद्यार्थिनी तथा डॉ. चरणजितसिंह सलूजा यांची कन्या सुष्मीत कौर हिने दहावीच्या परीक्षेत ९६.८० टक्के गुण मिळवून जिल्ह्यात द्वितीय क्रमांक पटकावला आहे.

सुष्मीतच्या यशाने शाळेच्या व जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे. तिचे हे यश आलापल्लीसारख्या भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी प्रेरणा व आशा देणारी आहे. या यशाबद्दल शिक्षकवर्ग, पालक आणि समाजातील सर्वच स्तरातून तिचे अभिनंदन होत आहे. नियमित अभ्यास, शिस्त, चिकाटी व परिश्रम यामुळे सुष्मीतने हे यश मिळवले आहे. अभ्यासू आणि शिस्तप्रिय विद्यार्थिनी म्हणून तिला ओळखले जाते.

ग्लोबल मीडिया केरला मॉडेल इंग्लिश मीडियम शाळेमधील शिक्षकांनी तिला योग्य मार्गदर्शन केले. मुख्याध्यापकांनी तिच्या मेहनतीचे कौतुक करत सांगितले की, “सुषमीतचे यश हे केवळ तिच्या मेहनतीचेच नव्हे, तर आमच्या संपूर्ण शैक्षणिक पद्धतीचे फळ आहे.” सुषमीतच्या यशामध्ये तिच्या आई-वडिलांचाही मोलाचा वाटा आहे. आई आणि वडील हे दोघेही डॉक्टर असून जिल्हाभरात सामाजिक क्षेत्रात सक्रिय आहेत.

वैद्यकीय क्षेत्रात जाऊन समाजसेवा करायची सुष्मितची इच्छा असून तिला सुद्धा पालकांप्रमाणेच डॉक्टर होऊन समाजकार्य करायचे आहे. सुष्मित कौरच्या य घवघवीत यशाबद्दल बलराम (भोलूभाऊ) सोमनानी यांनी तिचे कौतुक केले आहे. इयत्ता दहावीच्या परीक्षेत सुष्मित कौरने प्राविण्य प्राप्त करून आपल्या कुटुंब गावाचेही नाव उज्ज्वल केले. या यशाबद्दल बलराम सोमनानी उर्फ भोलूभाऊ यांनी तिचे भरभरून कौतुक करत अभिनंदन केले. तसेच पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत. सुष्मित कौरचे अभिनंदन करताना भोलू भाऊ म्हणाले की, मी पूर्वी तुला दिलेल्या शुभेच्छा आज सार्थ ठरल्या आहेत. तुझे यश हे माझ्यासाठीही एक वैयक्तिक समाधानाचा आणि अभिमानाचा क्षण आहे.

error: Content is protected !!