Home गडचिरोली खुशाल नेवारे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

खुशाल नेवारे यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार जाहीर

95
Oplus_16908288

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या नवरगाव ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी खुशाल नेवारे यांनी सन 2022 – 23 मध्ये उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल ग्रामविकास विभागाने त्यांना राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार 15 एप्रिल रोजी पत्रकातून जाहीर केला आहे.

सन 2022 -23 व 2023 -24 या वर्षातील पुणे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि नागपूर विभागातील राज्यस्तरीय आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची यादी महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाने नुकतीच जाहीर केली. यामध्ये गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा पंचायत समिती अंतर्गत 2022 – 23 करिता नवरगाव ग्रामपंचायतीचे ग्राम विकास अधिकारी खुशाल नेवारे यांची निवड करण्यात आली आहे.

जिल्हा परिषद स्तरावर उत्कृष्ट काम करणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना शासन स्तरावरून यशवंत पंचायतराज अभियान पुरस्कार सोहळ्यात पुरस्कार देण्यास येतात. त्यानुसार सदर दोन्ही वर्षांचे आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्काराची यादी निर्गमित करण्यात आली आहे.

सदर परिपत्रकाच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातून एक याप्रमाणे सर्वोत्कृष्ट ठरणाऱ्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना आदर्श ग्रामपंचायत अधिकारी पुरस्कार ग्रामविकास मंत्री यांच्या हस्ते यशवंत पंचायत अभियान पुरस्कार वितरण सोहळ्याप्रसंगी वितरित करण्यात येणार आहे.

सर्वोत्कृष्ट ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झालेल्या ग्रामपंचायत अधिकाऱ्यांना ग्रामविकास मंत्र्यांच्या स्वाक्षरीने प्रशस्तीपत्र देण्यास येतो. आदर्श राज्यस्तरीय ग्रामपंचायत अधिकारी म्हणून निवड झाल्याबद्दल खुशाल नेवारे यांचे गडचिरोली जिल्ह्यात सर्वत्र अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!