– आमदार सुधाकर अडबाले यांचे आवाहन
– आश्रमशाळा शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या विभागीय अधिवेशनात संघटन शक्तीचे प्रदर्शन
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : आश्रम शाळांमध्ये वैद्यकीय उपचार दृष्टीने नर्सेसची नेमणूक करावी ही मागणी लावून धरल्याने या नियुक्त्या लवकरच होणार आहेत. खाजगीकरणास माझा विरोध असून कर्मचाऱ्यांच्या नियमित नियुक्त्या कराव्यात. कंत्राटी शिक्षक व कर्मचाऱ्यांना शैक्षणिक सत्राच्या सुरुवातीलाच नियुक्तीचे आदेश द्यावे. मी शिक्षक व कर्मचाऱ्यांच्या चांगल्या कामासाठी तसेच त्यांच्यावर होणाऱ्या अन्यायाच्या विरोधात लढा देण्यासाठी कटीबध्द असून शासनाने जुनी पेन्शन योजना सर्वांना लागू करावी, असे आवाहन नागपूर विभाग शिक्षक मतदार संघाचे आमदार सुधाकर अडबाले यांनी केले.
आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटना (सिटू संलग्न) महाराष्ट्र राज्य नाशिक या संघटनेच्या नागपूर विभागाच्या वतीने शुक्रवार, १८ एप्रिल रोजी नागपूर येथील विदर्भ हिंदी साहित्य संमेलन सांस्कृतिक सभागृहात विभागीय अधिवेशनाचे आयोजन केले होते. या अधिवेशनात उद्घाटक म्हणून ते बोलत होते.
अधिवेशन कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा.बी.टी.भामरे होते. अधिवेशनात गडचिरोली जिल्ह्यातील गडचिरोली, अहेरी व भामरागड या तीन प्रकल्पासह नागपूर विभागातील नागपूर, वर्धा, देवरी, भंडारा, चंद्रपूर, चिमूर अशा एकूण ९ प्रकल्पातील शिक्षक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित राहून संवाद कार्यक्रमात संघटन शक्तीचे प्रदर्शन केले.
सत्कारमूर्ती म्हणून आदिवासी विकास नागपूर विभागाचे सेवानिवृत्त अपर आयुक्त रवींद्र ठाकरे व ज्योत्स्ना ठाकरे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह तसेच भेटवस्तू देऊन संघटनेच्या वतीने आदरयुक्त सत्कार करण्यात आला.
यावेळी विशेष निमंत्रित म्हणून महाराष्ट्र राज्य जुनी पेन्शन संघटनेचे राज्याध्यक्ष वितेश खांडेकर, स्वागताध्यक्ष म्हणून विजूक्टा संघटनेचे महासचिव डॉ. अशोक गव्हाणकर, सहस्वागताध्यक्ष म्हणून किट्स इंजीनियरिंग कॉलेज रामटेकचे प्राचार्य डॉ.अविनाश श्रीखंडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून देवरीचे प्रकल्प अधिकारी उमेश काशिद, वरिष्ठ संशोधन अधिकारी श्रीकांत धोटे, ज्येष्ठ मार्गदर्शक व सल्लागार रमेशचंद्र दहिवडे, संघटनेचे अमरावती विभागीय अध्यक्ष डॉ. अशोक झुंजारे, नाशिक विभागीय अध्यक्ष प्रा. अमोल वाबळे, राज्य कोषाध्यक्ष प्रा. शरद बिरादार, नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी, नागपूर विभागीय सचिव प्रा. अमृत मेश्राम, प्रा. प्रवीण भोपत, विदर्भ माध्यमिक शिक्षक संघटनेचे भूषण तल्हार ,अविनाश बडे, संतोष धोटे आदी मान्यवर उपस्थित होते.
अधिवेशनात प्रा. रमेशचंद्र दहिवडे, प्रा. अमृत मेश्राम, विभागीय प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, विभागीय उपाध्यक्ष यादव धानोरकर, विभागीय सहसचिव विकास जनबंधू, गडचिरोली जिल्हाध्यक्ष राधेश्याम पत्रे, भंडारा व गोंदिया जिल्हाध्यक्ष सदाशिव कोवे, चंद्रपूर प्रकल्पाचे अध्यक्ष डॉ. अमित नाईक, चिमूर प्रकल्पाचे अध्यक्ष मनोहर मेश्राम, अहेरी प्रकल्पाचे अध्यक्ष सूर्यवंशी दत्तात्रय, भामरागड प्रकल्पाच्या अध्यक्षा सुरेखा तेलतुंबडे, गडचिरोलीचे कोषाध्यक्ष आनंद शंखदरवार, नितीन खोडे आदींचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. अधिवेशनात अनेक मागण्यांवर व आश्रमशाळा समस्यांवर विचारमंथन करण्यात आले.
अधिवेशनास संघटनेचे पदाधिकारी देव बन्सोड, प्रवीण तुराणकर, गजेंद्र सोनोने, विवेक विरुटकर, काशिनाथ कुंडगीर, भास्कर राजगडे, भूपेंद्र शेंडे, बुलबुल वाळके, अंकलेश गणवीर, नेताजी गावळ, प्रमिला दहागावकर, मीनल शेट्टीवार, राजू चौखे, सोनम कोल्हे, अशोक कटरे, गोवर्धन खेडकर, किशोर कवठे, दुशन भोंगळे, सीमा लेंडे, गुणवंत फुले, ज्ञानेश्वर निलेकर, जयू राऊत आदींसह आश्रम शाळा शिक्षक व कर्मचारी बहुसंख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी यांनी केले. संचालन संघटनेच्या राज्य सचिव तथा महिला आघाडी प्रमुख करुणा लांजेवार व स्नेहा चनकापुरे यांनी केले. आभार प्रदर्शन लक्ष्मी भेलवा यांनी केले. अधिवेशनाच्या यशस्वीतेसाठी नागपूर विभागातील शिक्षक व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.







