Home गडचिरोली गडचिरोली येथे अधीक्षक दिलीप मेश्राम यांना निरोप

गडचिरोली येथे अधीक्षक दिलीप मेश्राम यांना निरोप

98

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक) गडचिरोली येथील अधीक्षक दिलीप मेश्राम यांना नियत वयोमानानुसार सेवानिवृत्त झाल्याने जिल्ह्यातील खाजगी शाळेतील शिक्षकेत्तर यांनी अनोखा पद्धतीने त्यांची बॅग्गीतुन मिरवणूक काढून निरोप दिला.
गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघ, गडचिरोली यांनी आयोजित केलेला हा सेवापूर्ती सोहळा संसस्मरणीय ठरला.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष दंडकारण्य शैक्षणिक संस्थेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे होते. प्रमुख अतिथी म्हणून शिक्षक आमदार सुधाकरराव अडबाले, शिक्षण उपसंचालक उल्हास नरड, वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (माध्य.), मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षकेत्तर महामंडळbपुणे, शमशेर खाँ पठाण, सचिव, अबुझमाड शिक्षण मंडळ गडचिरली, स्मिताताई लडके, मुख्याध्यापिका, कमलताई मुनघाटे हाय. तथा कनिष्ठ महाविद्यालय, गड. मुख्याध्यापिका वंदना मुनघाटे, सत्कारमूर्ती दिलीप विठोबाजी मेश्राम अधिक्षक, वेतन व भविष्य निर्वाह निधी पथक (माध्यमिक), गडचिरोली, जिल्हाध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, उपशिक्षणाधिकारी विवेक नाकाडे, वैभव बारेकर उपस्थित होते.

याप्रसंगी उल्हास नरड म्हणाले की, या जिल्ह्यात योग्य व्यक्तीचा अनोखा निरोपीय कार्यक्रम प्रथमच होत आहे. मान, सन्मान, निष्ठा, प्रतिष्ठा हा त्यांच्या कर्तृतवावर निर्माण होतो. याचे उदाहरण दिलीप मेश्राम आहेत. प्रतिष्ठा हे अधिकाऱ्यामुळे नाहीतर खालच्या कर्मचाऱ्याच्या कामामुळे त्यांचा सन्मान केला जातो. गडचिरोली जिल्ह्याला मी सोडले नाही आहे. या जिल्ह्याकडे माझे विशेष लक्ष असते.

आमदार सुधाकराव अडबाले म्हणाले की, मी नागपूर विभागाचा जवळपास दोन वर्षापासून शिक्षक आमदार आहे. मला सत्कारमूर्ती दिलीप मेश्राम यांना शिक्षक कर्मचारीकरिता कधीच फोन किंवा पत्र देण्याची संधी त्यांनी दिली नाही. ते स्वतः सर्वांचे काम करून देत होते. त्यांच्या कार्यालयात आलेला निधी कधीच त्यांनी वापस जाऊ दिला नाही, असे महाराष्ट्रमध्ये एकमेव कर्तव्यदक्ष अधिकारी दिलीप मेश्राम हे आहेत. राज्यातील हे पहिले वेतन पथक चे अधिकारी आहेत की ज्यांचे निरोप भव्य मिरवणूक काढून शिक्षकेत्तर संघटने एक आदर्श निर्माण केला आहे.

अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. राजाभाऊ मुनघाटे म्हणाले की, वाजत गाजत अशी बॅग्गीतून मिरवणूक काढून त्यांना सभास्थळी आणणे अशी संधी कोणत्याही अधिकाऱ्यांना आजपर्यंत मिळाली नाही आणि मिळतच नाही. भविष्यात अशी संधी आम्हाला सुद्धा मिळणार नाही. दिलीप मेश्राम यांचा प्रामाणिक, कर्तव्य, निष्ठाचे फळ हे त्यांना मिळाले. जिल्ह्यातील शिक्षकेत्तर त्यांना कधीच साहेब म्हणाले नाहीत, त्यांना दिलीपभाऊ म्हणून हाक मारायचे त्यांनी सुद्धा कधीच उच्च पदावर असताना साहेबगिरी केली नाही. त्यांनी जिल्हातील शिक्षकेत्तर सोबत मैत्री हि अतूट आहे. असे अधिकारी जिल्ह्याला मिळणे आवश्यक आहे. यांनी महाराष्ट्रात एक आदर्श निर्माण केला आहे.

यावेळी वासुदेव भुसे, शिक्षणाधिकारी (माध्य.), मोरेश्वर वासेकर, कार्याध्यक्ष, राज्य शिक्षकेत्तर महामंडळ, पुणे शमशेर खाँ पठाण, सचिव, अबुझमाड शिक्षण मंडळ, गडचिरोली यांनी समयोचित भाषण केले. यावेळी जिल्ह्यातील दोनशे शाळेतील शिक्षकेत्तर उपस्थित होते. अनेक शिक्षण संघटनेने दिलीप मेश्राम यांचा सत्कार केला.

कार्यक्रमाचे संचालन उदय धकाते यांनी तर आभार प्रदर्शन संदीप भरणे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नंदलाल लाडे, उपाध्यक्ष संघमित्रा भशारकर, उपाध्यक्ष, रुषी वासेकर, कोषाध्यक्ष
शैलेश कापकर, सहसचिव, अरुण धोडरे, सदस्य भुपेश वैरागडे, सदस्य हेमंत रामटेके यांनी परिश्रम घेतले. कार्यक्रमाला समस्त तालुका पदाधिकारी व सदस्यगण उपस्थित होते.

error: Content is protected !!