Home गडचिरोली ‘परिवर्तन’ दोन अंकी नाट्य पुस्तकाचे प्रकाशन

‘परिवर्तन’ दोन अंकी नाट्य पुस्तकाचे प्रकाशन

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांच्या हस्ते लेखक राजरत्न देविदास पेटकर लिखित ‘परिवर्तन’ या दोन अंकी नाट्य पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला.

गडचिरोली येथील जंगल कामगार सोसायटी सभागृहात ३०मार्च २०२५ रोजी प्रकाशन सोहळा पार पडला. या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला अशोककुमार वाडीभस्मे विभाग नियंत्रक रापम गडचिरोली, ज्येष्ठ नाटककार चुडाराम बल्हारपुरे, ज्येष्ठ नाट्य व सिनेअभिनेते, दिग्दर्शक डॉ. अनिरुद्ध वनकर, रविंद्र नलगंटीवार अधिक्षक आनंदवन, पत्रकार मिलींद उमरे, ज्येष्ठ नाटककार मोरेश्वर खर्डेकर, नरेंद्र वाडेसाहेब बिएसएनएल, अतुल रामटेके आगार व्यवस्थापक रापम गडचिरोली, संगिता टिपले आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी राजरत्न पेटकर यांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, त्यांच्या घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची होती. त्यावर मात करून आपले शिक्षण पूर्ण केले व राज्य परिवहन महामंडळ मध्ये नोकरीवर लागले. यातच त्यांनी आपला लिखाणाचा छंद जोपासत परिवर्तन या नाटकाचे लिखाण पूर्ण केले. राजरत्न पेटकर यांच्या अनेक कविता प्रकाशित झालेल्या आहे. परिवर्तन या नाटकामध्ये राज्य परिवहन महामंडळ गडचिरोली येथील कार्यरत कर्मचारी कलावंत आहेत. तसेच यावेळी मान्यवरांनी आपआपली मते व्यक्त केली.

कार्यक्रमाचे सुत्रसंचालन अशोक सुत्रपवार यांनी केले.
या प्रकाशन सोहळ्याला राज्य परिवहन महामंडळातील बहुसंख कर्मचारी व मित्र परिवार मोठ्या संखेने उपस्थित होते.

error: Content is protected !!