विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटना गडचिरोलीच्या अध्यक्षपदी आर. एस. गौरकर तर सचिवपदी आर. टी. फुकटे यांची बिनविरोध निवड झाली.
शनिवार, २२ मार्च २०२५ रोजी गडचिरोली येथील जवाहर भवन येथे जिल्हा न्यायालयीन बेलिफ संघटनेची वार्षीक आमसभा घेण्यात आली. यावेळी त्यांची सर्वानुमते पुढील २ वर्षासाठी निवड करण्यात आली. सदर आमसभा महाराष्ट्र राज्य बेलिफ महासंघाचे उपाध्यक्ष तथा जिल्हा संघटनेचे अध्यक्ष आर. एस. गौरकर यांच्या अध्यक्षतेखाली व जेष्ठ प्रमुख बेलिफ सी. एस. हनुमंते यांच्या प्रमुख उपस्थितीत घेण्यात आली.
यावेळी जिल्हा बेलिफ संघटनेचे सचिव आर. टी. फुकटे यांनी जमाखर्च सादर केला. या आमसभेला ए. डी. मून, एस. एल. दुर्गम, एम. एम. लभाने, आर. एम. पठाण, बी. के. खोब्रागडे, डी. एस. धोटे, एन. एम. रामटेके, एस. वाय. येनप्रेडीवार, एन. एन. येन्डे, एम. सी. गेडाम, ए. पी. तोटपल्लीवार आदी सभासद उपस्थित होते.







