Home गडचिरोली शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समितीचे गुरुवारी धरणे आंदोलन

शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी समितीचे गुरुवारी धरणे आंदोलन

97

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राज्यातील सर्व जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या विविध प्रलंबित प्रश्नांसाठी राज्यातील शासकीय, निमशासकीय शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी समन्वय समितीच्या वतीने गुरुवार, ६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता दोन तास धरणे आंदोलन व सत्याग्रह करण्यात येणार आहे.

सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी व मुख्याध्यापकांनी यात सहभागी व्हावे, असे आवाहन महाराष्ट्र राज्य माध्यमिक शाळा शिक्षकेतर संघटनेचे सरकार्यवाह शिवाजीराव खांडेकर यांनी केले आहे. माध्यमिक शाळेतील कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या व प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत. माध्यमिक शाळेतील शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी बक्षी समितीने शिफारस केल्याप्रमाणे नवीन सुधारित आश्वासित प्रगती योजनेचा १०:२०:३० वर्षाचा लाभतत्काळ मिळावा, पात्र शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वेतनश्रेणी संरक्षणासह शिक्षक पदावर विनाअट पदोन्नती द्यावी, माध्यमिक शाळांमधील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची रिक्त पदे लवकरात लवकर भरण्यात यावीत, माध्यमिक शाळेतील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना देण्यात आलेला २४ वर्षाचा दुसरा लाभ हा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या तारखेस लागू करण्यात आला तेव्हापासून तो लागू करण्यात यावा यांसह शासन दरबारी असणाऱ्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी गडचिरोलीजिल्ह्यातील सर्व शिक्षकेत्तर सेवकांनी धरणे आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन गडचिरोली जिल्हा माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा शिक्षकेत्तर सेवक संघटना, गडचिरोली चे अध्यक्ष अशोक काचिनवार, जिल्हा कार्यवाह उदय धकाते, कार्याध्यक्ष संदीप भरणे, उपाध्यक्ष प्रमोद येलमुले, नंदलाल लाडे, शैलेश कापकर, अरुण धोडरे, हेमंत रामटेके, भूपेश वैरागडे, अभिजित शिवणकर, हरिश्चन्द्र डोमळे, बंडू शिवणकर आदींनी केले आहे.

error: Content is protected !!