– तिसऱ्या वर्षीही स्तुत्य उपक्रम ; सातशे भाविकांचा उत्स्फूर्त सहभाग
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : संत निरंकारी मंडळ चामोर्शी व भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने प्रोजेक्ट अमृत अंतर्गत “स्वच्छ जल, स्वच्छ मन” या उपक्रमाद्वारे महाशिवरात्री निमित्त भरणाऱ्या यात्रोत्सवाचे औचित्य साधून मार्कंडा देवस्थान येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदी पात्राची रविवार, २३ फेब्रुवारी रोजी स्वच्छता करण्यात आली. या उपक्रमाचे हे तिसरे वर्ष आहे. यात सुमारे सातशे भाविकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात सदगुरू प्रार्थनाद्वारे करण्यात आली. कार्यक्रमाचे उद्घाटन मार्कंडादेव ग्रामपंचायतच्या सरपंच संगीता मोगरे यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी चामोर्शी संत निरंकारी मंडळाचे अध्यक्ष अशोक बोरकुटे होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून मंडळाचे संचालक भोजराम लंजे,देवनाथ धोडरे, फुलचंद गेडाम, निरंजना रामटेके, प्रफुल गव्हारे, वंदना धोडरे, विद्या बोरकुटे, संभाजी भूरसे, नामदेव गव्हारे, कोमरू मिटपल्लीवार, सुरेश बावणे, सुधाकर लोणारे आदी मान्यवर उपस्थित होते.
संत निरंकारी मिशन हे अध्यात्मिक मिशन असून मानवसेवा कार्य अविरतपणे करीत आहे. भारत सरकार सांस्कृतिक मंत्रालयाच्या प्रोजेक्ट अमृत अंतर्गत भारतातील पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची स्वच्छता करण्याचे कार्य मागील अनेक वर्षापासून सुरू आहे.यावर्षी भारतातील जवळपास ३ हजार ५०० ठिकाणी स्वच्छ जल, स्वच्छ मन उपक्रमांतर्गत जलसाठा स्वच्छता करण्याचे उद्दिष्ट आहे. या उपक्रमांतर्गत मार्कंडादेव येथील उत्तरवाहिनी वैनगंगा नदी घाट परिसर व पाणी पात्राची स्वच्छता करण्यात आली. सुमारे सातशे साध-संगत व सेवादल महात्मा यांनी या कार्यात उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. यानिमित्त सर्वांसाठी लंगर,चहा व नाश्ताची व्यवस्था करण्यात आली.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामदास पुंगाटी, घनश्याम बोदलकर, नाजूक येलमुले, रवींद्र बुरांडे, कल्पना सातपुते, रूपचंद कुमरे, महेंद्र बोरकुटे, आशुतोष कोठारे, पियुष बोद्दलकर, बालाजी गव्हारे, संतोष आलेवार, संतोष वडेंगवार, सुभाष मिटपलीवार, प्रमोद देवगिरकर, प्रमोद सातपुते, घनश्याम वासेकर, प्रभाकर कडस्कर, मंगला गेडाम, सिडाम माताजी, उज्वला बुरांडे, वैशाली लंजे, धनराज मडावी, सिंधुताई पुंगाटी, अशोक पुलीवार, अवतार तंटकवार आदींनी मोलाचे सहकार्य केले.







