Home गडचिरोली कारवाफा आश्रमशाळेत शिवजयंती साजरी

कारवाफा आश्रमशाळेत शिवजयंती साजरी

112

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी गावातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेची शोभायात्रा काढण्यात आली. त्यांच्या जीवनकार्यावर आधारित सामूहिक नृत्य सादर करण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक विष्णू चव्हाण होते. प्रमुख अतिथी म्हणून माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे, वर्षा मस्के, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षिका कविता बारसागडे, संगीता पुराम, करिष्मा गोवर्धन, अधीक्षिका पुष्पा चव्हाण, सुनिता देवावार, संगीता करंगामी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांनी तसेच विद्यार्थी महेश आतला, समीक्षा उसेंडी, अशिका मडावी, अर्पणा नरोटे, खुशी नरोटे, पायल आतला यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्यावर विचार व्यक्त केले. इयत्ता पाचवीच्या विद्यार्थिनी पूर्वी परसे, मीनाक्षी गावडे, शिल्पा उसेंडी, सारिका हिचामी, अंजली मडावी, अवनी मडावी, समीक्षा उसेंडी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्यावर आधारित सामूहिक नृत्य सादर केले.
कार्यक्रमाचे संचालन पिंकी एक्का या विद्यार्थिनीनी केले. विद्यार्थिनी साक्षी नरोटे हिने उपस्थितांचे मानले.

error: Content is protected !!