Home गडचिरोली आजपासून गडचिरोलीत टी २० चा थरार ; रवी शास्त्री येणार उद्घाटनाला

आजपासून गडचिरोलीत टी २० चा थरार ; रवी शास्त्री येणार उद्घाटनाला

104
Oplus_131072

– जीडीपीएलच्या प्रेक्षकांसाठी मोफत बसेस, टी शर्ट आणि नाश्ताही

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरात प्रथमच लॉईड्स मेटल्स अँड एनर्जी लिमिटेड (LMEL) तर्फे आयोजित गडचिरोली डिस्ट्रिक्ट प्रीमियर लीग (GDPL) स्पर्धेच्या टी २० सामन्यांचा थरार आज, ५ फेब्रुवारी २०२५ पासून गडचिरोलीकरांना अनुभवता येणार आहे. येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर सदर क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या क्रिकेट स्पर्धेच्या उद्घाटनाला उद्घाटक म्हणून भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवि शास्त्री हे उपस्थित राहणार आहेत.

क्रीडांगणावर पोहचण्यासाठी प्रेक्षकांना बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. सोबतच वेळेपूर्वी पोहचणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि भरपेट नाश्ताही देण्यात येणार आहे. गडचिरोली येथील एमआयडीसी (MIDC) मैदानावर ही क्रिकेट स्पर्धा होणार आहे. ५ फेब्रुवारीला दुपारी साडेतीन वाजता भारताचे माजी खेळाडू आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या हस्ते लॉयड्स मेटल्सचे व्यवस्थापकीय संचालक बी. प्रभाकरन यांच्या उपस्थितीत स्पर्धेचे उद्घाटन होणार आहे. रवी शास्त्री यांना सन्मानित केल्यानंतर स्पर्धेतील सर्व संघांचा मार्च पास्ट होणार आहे. यावेळी होणारे सांस्कृतिक कार्यक्रम हे संपूर्ण सोहळ्याचे मुख्य आकर्षण असणार आहे.

दुपारी ३ वाजतापूर्वी आत येणाऱ्या प्रेक्षकांना टी शर्ट आणि नाश्ता देण्यात येणार आहे. शिवाय एमआयडीसी मैदानावर पोहचण्यासाठी गडचिरोली येथील राधे बिल्डींग समोरुन, बस डेपो, इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृह,आयटीआय चौक, न्यायालय परिसर या ठिकाणांहून मोफत बसेसची व्यवस्था करण्यात आली आहे. क्रिकेटप्रेमींनी हा ऐतिहासीक सोहळा आणि सामन्यांचा आनंद घेण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन बलराम उपाख्य भोलू सोमनानी यांनी केले आहे.

सामने पाहण्यास मोफत जाण्या येण्याची सोय

एम आय डी सी (MIDC) मैदानावर सामने होणार असून प्रेक्षकांना या स्पर्धेचा प्रत्यक्षात थरार अनुभवता यावा यासाठी मैदानापर्यंत जाण्यासाठी मोफत जाण्या – येण्याची सोय करण्यात आली आहे. संपुर्ण सामने हे मोफत आहेत. जाण्या मैदानावर जाण्यासाठी विशिष्ठ ठिकाणाहून व्यवस्था करण्यात आली आहे.

मैदान परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था

सदर स्पर्धेच्या परिसरात स्टॉल, दुकाने लावण्याची व्यवस्था करण्यात आली. आयोजकांकडून मोफत लाईट ची व्यवस्थाही तसेच कोणतेही कर करण्यात येणार नाही आहे. ज्यांना दुकाने, स्टॉल लावायचे असतील त्यांनी आयोजकांशी संपर्क करावा असे आवाहनही यावेळी करण्यात आले आहे.

error: Content is protected !!