दिल्ली येथे संसदीय संकुल विकास परियोजनेची बैठक संपन्न

18

– बैठकीत मा. खा. तथा भाजपा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांची प्रमुख उपस्थिती

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : दिल्ली येथे संसदीय संकुल विकास परियोजनेची बैठक २९ जानेवारी २०२५ ला नई दिल्ली येथे आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत संसदीय संकुल विकास परि योजना यावर सविस्तर विस्तृत चर्चा करत ही बैठक राष्ट्रीय संगठन महामंत्री आदरणीय श्री. बी. एल. संतोषजी व राष्ट्रीय संगठक आदरणीय श्री. वी. सतीशजी यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आली.

या संसदीय संकुल विकास परियोजने संबंधीत महत्वपूर्ण बैठकीत जनजातीय समाजाला सशक्तिकरण आणि आत्मनिर्भर भारत ही संकल्पना मजबूत करण्यासाठी या बैठकीला सविस्तर चर्चा झाली. यावेळी बैठकीला प्रामुख्याने भाजपा राष्ट्रीय संगठन महामंत्री बी. एल. संतोषजी, भाजपा राष्ट्रीय संघटक सतीशजी, भाजपा जनजाती मोर्चा राष्ट्रीय अध्यक्ष समीर उरावजी, भाजपा राष्ट्रीय महामंत्री अनु.जनजाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, राष्ट्रीय महामंत्री खा. गजेंद्रजी पटेल, राष्ट्रीय महामंत्री गजानन डांगेजी व इतर जनजाती मोर्चाचे मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.