– सांस्कृतिक कार्यक्रमातून कलागुणांची उधळण
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील चामोर्शी मार्गावरील कात्रटवार कॉम्प्लेक्स मधील कमल-केशव सभागृहात गडचिरोली शहरातील जैन कलार समाज भगिनींचा हळदीकुंकू व स्नेहमिलन सोहळा उत्साहात पार पडला. यातून एकतेचा संदेश देत सांस्कृतिक कलागुणांची उधळण करण्यात आली.
मकर संक्रांत कार्यक्रमाच्या निमित्ताने सुहासिनींनी वाण वितरित करून एकमेकांशी संवाद साधला. मनोरंजनात्मक कार्यक्रम, नाटिका, एकल नृत्य, समूह नृत्य, मॅचिंग स्पर्धा, कॅटवॉक, बौद्धिक खेळ, उखाणे, गीत गायन, रांगोळी स्पर्धा, संगीत खुर्ची, प्रश्नमंजुषा अशा विविध स्पर्धा घेण्यात आल्या. विजेत्या स्पर्धकांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. उपस्थित सर्वांनी सहभोजनाचा आनंद घेतला.
कार्यक्रमाचे नियोजन व व्यवस्थापनेसाठी चामोर्शी मार्गावरील ज्योती फरांडे, नमिता डांगे, श्रद्धा दडवे, दिपाली दडवे, कल्पना तिडके, रेखा गुरुकार, मंगला गोटेफोडे, अर्चना मानापुरे, नंदा डांगे, तेजस्विनी किरणापुरे, डॉ. पियुषा समर्थ, रोशनी डांगे, जयश्री आष्टेकर, रिना दडवे, सपना तिडके या भगिनींनी पुढाकार घेतला.
कार्यक्रमास भाग्यश्री शेंडे, कल्पना लाड, कविता डवले, ज्योती समर्थ, भावना रणदिवे, ज्योती मुरकुटे, लता मुरकुटे, स्वाती कवठे, अरुणा लांजेकर, स्नेहा शेंडे, सरिता पेशने, अर्चना भांडारकर, माधुरी घुगरे, मंजुषा घुगरे, हर्षा हरडे, अल्का हरडे, शारदा हजारे, वर्षा शनिवारे, वीणा शनिवारे, लक्ष्मी हजारे, नीलिमा खानोरकर आदींसह जैन कलार समाजातील भगिनी बहुसंख्येने उपस्थित होत्या.







