Home गडचिरोली सोडे येथे गुरुवारला आदिवासी पालक व लाभार्थी मेळावा

सोडे येथे गुरुवारला आदिवासी पालक व लाभार्थी मेळावा

70

– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके राहणार उपस्थित

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभाग नागपूर अंतर्गत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने आदिवासी पालक व लाभार्थी मेळाव्याचे आयोजन गुरुवार, २३ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता धानोरा तालुक्यातील सोडे येथील शासकीय माध्यमिक कन्या आश्रम शाळेत केलेले आहे.

या मेळाव्याचे उद्घाटन राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके राहणार आहेत. यावेळी विशेष अतिथी म्हणून अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ, वित्त, नियोजन, कृषी, मदत पुनर्वसन, विधी व न्याय, कामगार राज्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे सहपालकमंत्री ॲड. आशिष जयस्वाल उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून खासदार डॉ. नामदेव किरसान, आमदार धर्मरावबाबा आत्राम, आमदार डॉ. मिलींद नरोटे, आमदार रामदास मसराम, माजी खासदार अशोक नेते, माजी आमदार डॉ. देवराव होळी, सोडे ग्रामपंचायतच्या सरपंच पूनम किरंगे, आदिवासी विकास विभाग नागपूरचे अपर आयुक्त रविंद्र ठाकरे (भाप्रसे), जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा (भाप्रसे) आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

कार्यक्रमास आदिवासी पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना (भाप्रसे) यांनी केले आहे.

error: Content is protected !!