Home गडचिरोली वडसा येथे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भेटी

वडसा येथे माजी आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतल्या भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भेटी

82
Oplus_131072

– भेटीदरम्यान राबविली भाजपा सदस्यता मोहीम

नववर्षानिमित्त डायरी व कॅलेंडर भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सध्या भारतीय जनता पार्टीची सदस्यता मोहीम जोरात सुरू असून गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार तथा भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी यांनी वडसा येथे भाजपा पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेत भाजपा सदस्यता अभियान राबविले.

याप्रसंगी त्यांनी भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हा अध्यक्ष किसनजी नागदेवे, वडसा तालुका अध्यक्ष सुनील पारधी, जिल्हा उपाध्यक्ष राजू जेठानी, अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हाध्यक्ष बबलू हुसैंनी, वडसा शहर अध्यक्ष सचिन खरकाटे, जिल्हा सचिव सचिव वानखेडे, सोनू नागदेवे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या भेटी घेतल्या व त्यांना नववर्षानिमित्त डायरी व कॅलेंडर भेट देत अभियान राबविण्याचे आवाहन केले.

error: Content is protected !!