– सलग तीन वर्ष प्रथम पुरस्काराने सन्मानित
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : सहकार क्षेत्राला बळकटी मिळावी तसेच प्रामाणीक आणि चोख काम बजावणाऱ्या, सहकारी कायदे आणि नियमांची चौकट सांभाळून प्रगती साधणाऱ्या पतसंस्थांना ‘बँको पतसंस्था ब्लू रिबन’ पुरस्काराने सन्मानीत करण्यात येते. दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित गडचिरोलीची सलग तिसऱ्यांदा या पुरस्कारासाठी निवड झाली आहे. सदर पुरस्कार 30 जानेवारी 2025 रोजी लोणावळा येथे सहकारी पतसंस्थेच्या आयोजीत ‘बँको सहकार परिषद 2025’ मध्ये मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात येणार आहे.
राज्यातील नागरी सहकारी पतसंस्थेच्या 100 कोटी ते 125 कोटी ठेवी असलेल्या प्रवर्गातून या पुरस्कारासाठी महाराष्ट्रातल्या विविध पतसंस्थांनी भाग घेतला होता. महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाच्या नियमावलीनुसार प्रस्तावांचे परीक्षण करुन सहभागी झालेल्या पतसंस्थेच्या प्रस्तावांचे तज्ञ परीक्षण समितीने दिलेल्या अहवालानुसार पतसंस्थेची ब्लु रिबन पुरस्कारासाठी निवड केल्या जाते.
दि गडचिरोली नागरी पतसंस्थेची सलग तिसऱ्यांदा ‘बँको ब्लू रिबन’ पुरस्कारासाठी निवड झाल्याबददल पतसंस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री, उपाध्यक्षा सुमतीताई मुनघाटे, मानद सचिव सुलोचनाताई वाघरे, संचालक पंडीत पुडके, प्रा. मधुकर कोटगले, पवन मुनघाटे, दिलीप उरकुडे, शेषराव येलेकर, दिलीप पाटील खेवले, मुकूंद म्हशाखेत्री, किशोर मडावी, कृष्णा दुधे, संध्या खेवले, पांडुरंग चिलबुले, व्यवस्थापक लिंगाजी मोरांडे, भूषण रोहणकर, सर्व शाखा व्यवस्थापक व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन होत आहे.
या पतसंस्थेच्या जिल्ह्यात 9 शाखा असून या शाखांशी जुळलेल्या सर्व सभासद, ग्राहक, ठेवीदार, हितचिंतक, ठेव अभिकर्ता, शाखा व्यवस्थापक, सर्व कर्मचारी व संचालक मंडळातील सर्व सदस्य यांच्या परस्पर सहकार्यामुळे हे यश आल्याचे संस्थेचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री यांनी सांगितले आणि सर्वांचे त्यांनी अभिनंदन केले.







