Home गडचिरोली राधेश्याम पत्रे यांच्या ‘माझा अरण्य प्रवास’ पुस्तकाचे विमोचन

राधेश्याम पत्रे यांच्या ‘माझा अरण्य प्रवास’ पुस्तकाचे विमोचन

276

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आदिवासी विकास विभागातील सेवा निवृत्त मुख्याध्यापक राधेश्याम पत्रे यांच्या ‘माझा अरण्य प्रवास’ या पुस्तकाचे अपर आयुक्त कार्यालय नागपूर येथे शुक्रवार २७ डिसेंबर रोजी अपर आयुक्त रवींद्र ठाकरे यांच्या हस्ते विमोचन झाले.

विमोचन सोहळ्यास प्रमुख अतिथी म्हणून सीटू संलग्नित आदिवासी विकास आश्रमशाळा शिक्षक व कर्मचारी संघटनेचे राज्य सरचिटणीस प्रा. बी. टी. भामरे, उपआयुक्त डिगांबर चव्हाण, संघटनेचे नागपूर विभागीय अध्यक्ष रामदास खवशी आदी मान्यवर उपस्थित होते.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक राधेश्याम पत्रे हे देसाईगंज येथील रहिवासी असून आदिवासी विकास विभागातील दऱ्या – खोऱ्यात, दुर्गम, अतिदुर्गम भागात आश्रमशाळेमध्ये माध्यमिक शिक्षक ते मुख्याध्यापक पदापर्यंत काम केले. ग्यारापत्ती, येंगलखेडा, घाटी येथे माध्यमिक शिक्षक म्हणून तर मसेली येथे माध्यमिक मुख्याध्यापक म्हणून कार्यरत होते. गडचिरोली येथे सहाय्यक प्रकल्प अधिकारी म्हणून देखील ते काही कालावधीसाठी कार्यरत होते. आदिवासी विकास विभागात २६ वर्षाच्या सेवेत त्यांना विद्यार्थी, पालक व आदिवासी समाजात आलेला अनुभव तसेच आदिवासी विद्यार्थ्यांच्या हितासाठी राबविलेल्या नवनवीन उपक्रमाचे व ते राबविताना प्रतिकूल परिस्थितीत केलेल्या सकारात्मक जीवन प्रवासाचे या पुस्तकांमध्ये कथन केलेले आहे. सदर पुस्तक शिक्षक व विद्यार्थ्यांना प्रेरणादायी आहे.

कार्यक्रमास संघटनेच्या सचिव करुणा लांजेवार, गडचिरोली प्रकल्प अध्यक्ष देव बन्सोड, दत्तात्रय सूर्यवंशी, सुरेखा तेलतुंबडे, प्रसिद्धी प्रमुख सुधीर शेंडे, के. व्ही. कुंडगीर, विवेक विरुटकर, सी. जी. भिवगडे, विकास जनबंधू, रामदास शहारे, तुकाराम सोनकुसरे, पुरुषोत्तम डोंगरवार, सुनील कापगते, संतोष धोटे, पी. आर. शंभरकर, एन. जी. कांबळे, प्रदीप लोहकरे, पी. एम. चिमूरकर, बी. एल. लंजे, गुलाब हर्षे, डी. सी. शिंपी, एन. यु. मोहतुरे आदींसह आश्रमशाळेतील शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

error: Content is protected !!