Home गडचिरोली आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची धानोरा येथील जि. प. हायस्कूलला भेट

आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांची धानोरा येथील जि. प. हायस्कूलला भेट

72

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे नवनियुक्त आमदार डॉ. मिलिंद नरोटे यांनी धानोरा तालुका दौऱ्यावर आले असता, जिल्हा परिषद हायस्कूलला भेट दिली. यावेळी जिल्हा परिषद शाळेच्या मुख्याध्यापकांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शौचालय, पिण्याचे पाणी आदी मुलभूत सुविधांचा अभाव असल्याचे दिसून आले.

विद्यार्थ्यांना दर्जात्मक शिक्षण दिले गेले पाहिजे याकरिता प्रशासनाकडून लक्ष दिले जाईल अशी हमी दिली. तसेच इतर अनेक शैक्षणिक समस्या बाबत शिक्षण विभागाशी दूरध्वनीने संपर्क करून समस्याचे निराकरण करण्यास सांगितले. जि. प. हायस्कूलच्या वस्तीगृहाच्या दुरुस्तीचे काम सुरू असून त्याची सुध्दा पाहणी केली. हे काम चांगल्या दर्जाचे व्हायला पाहिजे, अशी सूचना कंत्राटदाराला दिली.

error: Content is protected !!