Home गडचिरोली डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

डॉ. मिलिंद नरोटे यांच्या निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन

110
Oplus_131072

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विधानसभेच्या प्रचारानिमित्त आज, ५ नोव्हेंबर रोजी गडचिरोली मतदारसंघातील माजी खासदार अशोकजी नेते जनसंपर्क कार्यालयजवळ चामोर्शी रोड येथे निवडणूक प्रचार कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार तथा राष्ट्रीय महामंत्री अनु.-जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते यांच्या हस्ते संपन्न झाले.

गडचिरोली विधानसभा येथे विकासकामे अविरत करण्यासाठी येणाऱ्या 20 तारखेला कमळ या चिन्हासमोरील बटन दाबून मला मतदान रुपी आशीर्वाद देण्याची विनंती डॉ. मिलिंद नरोटे यांनी उपस्थित जनतेला केली.

यावेळी माजी खासदार तथा अनु. जनजाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोकजी नेते, आमदार तथा भाजपा प्रदेश उपाध्यक्ष डॉ. देवरावजी होळी, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे, माजी आमदार डॉ. नामदेवराव उसेंडी, ज्येष्ठ नेते बाबुरावजी कोहळे, ज्येष्ठ नेते रमेशजी भुरसे, शिवसेना जिल्हा प्रमुख हेमंत जंबेवार, विधानसभा संयोजक प्रमोदजी पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, भाजपा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, प्रकाशजी गेडाम, शिवसेना नेते राजूजी कावळे, किसान मोर्चा जिल्हाध्यक्ष रमेशजी बारसागडे, ओबीसी मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गिताताई हिंगे, डॉ. चंदाताई कोडवते, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके व भाजपा महायुतीचे पदाधिकारी व नागरिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होते.

error: Content is protected !!