गडचिरोली शहरातील शारदा व दुर्गा देवींचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी घेतले दर्शन

17

– गडचिरोली शहरातील बाजार चौक, गोकुलनगर, पंचवटी नगर, गांधी वार्ड, विठ्ठल मंदिर, श्रीराम मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर हनुमान वार्ड येथील शारदा, दुर्गा मंडळाला दिल्या भेटी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : शहरातील शारदा, दुर्गा उत्सव मंडळाला आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी भेटी देत शारदा व दुर्गा देवी चरणी नतमस्तक होत दर्शन घेतले.

यावेळी प्रामुख्याने राष्ट्रवादी (अ. प. ) गटाचे रवींद्रजी वासेकर, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, पूनम हेमके, अरुण अंडेल, त्रिशा डोईजड, स्वाती चंदनखेडे, संकेत येणप्रेड्डीवार, तसेच शहरातील शारदा, दुर्गा उत्सव मंडळाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.