विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : येथील आरमोरी मार्गावरील लक्ष्मीनगर वार्डात महिलांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेऊन गुरुवार, १० ऑक्टोबर रोजी बतकम्मा देवीचा उत्सव साजरा केला.
या उत्सवात वैशाली पडिशालवार, निरजा देसुवार यांनी पुढाकार घेऊन रंगीबेरंगी फुलांची सजावट करून बतकम्मा देवीची मूर्ती साकारली. त्यानंतर उपस्थित महिलांनी बतकम्मा देवीचे पूजन केले. महिलांनी दांडिया खेळून नाच, गाणे सादर केले. या उत्सवाचा आनंद घेतला व बतकम्मा देवीचा जयघोष केला. यावेळी परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. उत्सवात वैशाली रणदिवे, ममता रणदिवे, स्नेहा शेंडे, राखी चिलवारवार, विद्या नैताम, साची मसराम, प्रतिभा खोब्रागडे, भावना सूत्रपवार, अर्चना माणूसमारे, कीर्ती गोबाडे, प्रेमिला लांजेवार, नंदा मेश्राम, शालिनी तर्वेकर, सोनू घुमडेलवार आदीसह महिला बहुसंख्येने उपस्थित होत्या.







