गडचिरोली जिल्ह्यात विकासाला गती व चालणारे देण्याचे काम माझ्या कार्यकाळात केले

15

– मा. खा. अशोकजी नेते यांचे धानोरा येथे सस्नेह भोजन सोहळ्याप्रसंगी प्रतिपादन

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा येथे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांचा एकत्रित सहविचार निर्माण व्हावा. यासाठी ८ आक्टोबर रोजी शासकिय विश्रामगृह धानोरा येथे सस्नेह भोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते.

या सस्नेह भोजनाच्या निमित्ताने भाजपा संघटनेबाबत छोटीखाणी भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते यांची आढावा बैठक घेताना माजी खासदार तथा भाजपा अनु.जनजाती मोर्चा राष्ट्रीय महामंत्री तथा विधानसभा निवडणूक संचालन समितीचे सहसंयोजक अशोकजी नेते बोलताना म्हणाले, माझ्या दहा वर्षाच्या कारकिर्दीत वडसा – गडचिरोली रेल्वे, जिल्ह्यात रेल्वेचे जाळे, मेडिकल कॉलेज, कोटगल, चिचडोह बँरेजेस, सुरजागड लोह प्रकल्प, नँशनल हाँयवे, रस्त्याची कामे असे अनेक प्रश्न लोकसभेत मांडून जनतेच्या सेवेसाठी अनेक विकासाभिमुख कामे केलेली आहे. यापुढेही मी जनतेच्या सेवेत तत्पर राहील.जनतेच्या अडीअडचणी असल्यास मी निश्चितच सोडवण्याचा प्रयत्न करीन. आपण लोकसभेच्या निवडणूकीत प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरीत्या केलेल्या सहकार्याबद्दल आपले आभार व्यक्त करतो, असे मत मा. खा. नेते यांनी या सस्नेह भोजनाच्या कार्यक्रमाप्रसंगी केले.

याबरोबरच पुढे बोलतांना महायुतीच्या सरकारने मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली. या योजनेत माझ्या महिला भगिनींना कुठल्याही प्रकारचे त्रास होऊ नये व या योजनेच्या लाभापासून वंचित राहु नये यासाठी धानोरा येथे जनसंपर्क कार्यालय खोलण्यात आले. मुख्यमंत्री लाडकी बहिण या योजनेत प्रत्येक महिलांच्या खात्यात दर महिन्याला 1500 रुपये देत आहे. यामुळे महिलांच्या कुटुंबाला मोठा आधार झाला असून त्यांचा आत्मसन्मान वाढला असल्याचे मत नेते यांनी यावेळी व्यक्त केले.

यावेळी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री गोविंदजी सारडा, जिल्हा उपाध्यक्ष तथा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंदजी नरोटे, जिल्हा उपाध्यक्ष डॉ. भारतजी खटी, ता. महामंत्री विजय कुमरे, शहराध्यक्ष सारंग साळवे, माजी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्ष ताराबाई कोटागले, शक्तीजी केराम, नगरसेवक संजय कुंडू, नगरसेवक अनिल म्हशाखेत्री, माजी नगरसेवक सुभाष धाईत, सरफराज शेख, साजन गुंडावार, राकेश दास, सुभाष खोबरे, माजी उपाध्याय बंडुजी उंदिरवाडे, राकेश खरवडे, वैशाली धाईत, प्रतिशा गुंडावार, भुमाला परचाके, निराशा मडावी, गिता वालको, तसेच मोठ्या संख्येने नागरिक जनता व महिला भगिनी उपस्थित होते.