Home गडचिरोली गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती झालीच पाहिजे

गडचिरोली जिल्ह्याची स्थानिक भरती झालीच पाहिजे

87
Oplus_0

 – तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम (सिनेट सदस्या गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली) यांची मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : अतिदुर्गम व नक्षलग्रस्त म्हणून ओळख असलेल्या गडचिरोली जिल्हातील सर्व प्रशासकीय विभागाअंतर्गत येणाऱ्या (क व ड) संवर्गातील पद पोलिस भरतीप्रमाणे स्थानिक उमेदवाराकडुन भरण्यात यावी व या संदर्भात शासन निर्णय काढण्यात यावा, अशी मागणी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोलीच्या सिनेट सदस्या तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांनी केली आहे.

या मागणीच्या अनुषंगाने तनुश्रीताई धर्मरावबाबा आत्राम यांच्या नेतृत्वात शेकडो युवा बेरोजगारांना घेऊन गडचिरोलीचे जिल्हाधिकारी यांच्यामार्फतीने मा. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांना पत्र पाठविले. त्यावेळी शेकडो युवा बेरोजगार उपस्थित होते.

error: Content is protected !!