Home गडचिरोली आमदार डॉ. देवराव होळी माळी समाजावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती

आमदार डॉ. देवराव होळी माळी समाजावर विशेष प्रेम करणारी व्यक्ती

76

– मध्यवर्ती बँकेचे संचालक भैय्याजी वाढई यांचे प्रतिपादन

– चामोर्शी येथे माळी समाज बांधवांचा मेळावा उत्साहात

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी माळी समाजाच्या विकासासाठी नेहमीच प्रयत्न केले असून ते माळी समाजावर विशेष प्रेम करणारे व्यक्ती आहेत त्यामुळे माळी समाज नक्कीच त्यांच्या पाठीशी मोठ्या शक्तीने उभा राहील, असे प्रतिपादन गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, माळी समाजाचे नेते भैय्याजी वाढई यांनी तेली समाज सभागृह चामोर्शी येथे आयोजित माळी समाज बांधवांच्या मेळाव्याप्रसंगी केले.

यावेळी मंचावर आमदार डॉ. देवरावजी होळी, माळी समाजाचे गजाननजी आदे, अल्काताई ठाकरे, विठ्ठल वाडगुरे, भालचंद्र वाढई, विठ्ठल बोरुले, छायाबाई मांदाडे, उष्टुजी शेंडे, दीपक मोहुर्ले, दिवाकर निकोडे, योगेश शेंडे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. माळी समाज बांधव व गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या वतीने चामोर्शी येथे माळी समाज बांधवांचा मेळावा चामोर्शी येथे आयोजित करण्यात आला. या मेळाव्याला तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती दर्शविली.

यावेळी आमदार महोदयांनी मेळाव्याला उपस्थिती दर्शवून आपल्यावर प्रेम व्यक्तकरणाऱ्या माळी समाज बांधवांचे आभार मानले. माळी समाजाचे प्रेम आपल्यावर असेच वृद्धिंगत होत राहो, अशी प्रार्थना ही त्यांनी समाजाला केली. माळी समाजाच्या विकासासाठी आपण सातत्याने प्रयत्न करीत असून यापुढेही समाजाच्या समस्या सोडवण्यासाठी अग्रेसर राहू, असे प्रतिपादन आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी या मेळाव्याप्रसंगी उपस्थित समाज बांधवांना मार्गदर्शन करताना केले.

error: Content is protected !!