Home गडचिरोली १० वर्षांच्या कार्याचा लेखाजोका चित्रफितीतून सादर करण्याचा छोटासा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार...

१० वर्षांच्या कार्याचा लेखाजोका चित्रफितीतून सादर करण्याचा छोटासा प्रयत्न कौतुकास्पद : आमदार डॉ. देवरावजी होळी

84

– गणेश चतुर्थीच्या शुभपर्वावर चित्रफितिचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते लोकार्पण

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : आपल्या मागील १० वर्षांच्या आमदारकीच्या कार्यकाळात गडचिरोली विधानसभा क्षेत्रात आपण केलेल्या कामाचा लेखाजोखा चित्रफितीच्या माध्यमातून मांडण्याचा दैनिक देशोन्नतीचा प्रयत्न खरोखरच अभिनंदनिय आहे. त्याबद्दल त्यांचे अभिनंदन करतो व त्यांची ही चित्रफित खरोखरच कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांनी दैनिक देशोन्नतीच्या कार्यालयामध्ये संपन्न झालेल्या या चित्रफितीच्या लोकार्पणप्रसंगी केले.

यावेळी माजी नगराध्यक्ष तथा जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, माजी उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा महामंत्री मधुकर भांडेकर, कृ. उ. बाजार समिती संचालक हेमंत बोरकुटे, शहर महामंत्री नरेश हजारे, मनिष रक्षमवार, गणेश पुण्यप्रेड्डीवार यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते प्रामुख्याने उपस्थित होते.

error: Content is protected !!