अत्याचार व हिंसेच्या निषेधार्थ मूक आंदोलन

32

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : राज्यातील बदलापूर व अनेक जिल्ह्यांमध्ये सातत्याने महिलांवर होत असलेल्या अत्याचार व हिंसा या सारख्या वाढत्या घटनांचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सुचनेनुसार नागपूर येथील संविधान चौकात सरकारच्या विरोधात मूक आंदोलन करण्यात आले.

राज्यात सातत्याने घडत असलेल्या अत्याचार व हिंसा या सारख्या घटनांवर आळा घालण्यासाठी सरकारने ठोस उपाययोजना करण्याची गरज असल्याची अपेक्षा याप्रसंगी व्यक्त करण्यात आली. या आंदोलनाच्या वेळी राज्याचे विरोधी पक्षनेते आमदार विजय वडेट्टीवार, नागपूर शहर काँग्रेस कमिटेचे अध्यक्ष तथा आमदार विकास ठाकरे, आमदार अभिजित वंजारी यांच्यासह इतर नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.