प्रा. अजय जाधव सेट परीक्षा उत्तीर्ण

40

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : धानोरा तालुक्यातील गुट्टा येथील भगवंतराव अनुदानित माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेतील प्राध्यापक अजय जाधव यांनी सेट परीक्षा पहिल्याच प्रयत्नात उत्तीर्ण केली व घवघवीत प्राप्त केले.

सावित्रीबाई फुले विद्यापीठ पुणे द्वारा घेण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला. समाजकार्य विषयाची २०२४ ची महाराष्ट्र राज्य सहाय्यक प्राध्यापक पात्रता परीक्षा त्यांनी उत्तीर्ण केली. प्रा. अजय जाधव यांचे शिक्षण इंग्रजी,अर्थशास्त्र, राज्यशास्त्र विषयात एम. ए. तसेच बी.एड. व एम. एस. डब्ल्यू. आहेत. या यशाबद्दल संस्थाचालक समशेरखान पठाण, प्राचार्य ए. बी. बलगुजर व शाळेतील सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी कौतुक केले असून त्यांचे सर्व क्षेत्रातून अभिनंदन होत आहे.