कारवाफा आश्रमशाळेत स्वातंत्र्य दिन साजरा

29

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोली अंतर्गत शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा कारवाफा येथे ७८ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी गावातून प्रभातफेरी काढण्यात आली.

ध्वजारोहण मुख्याध्यापक विष्णू चव्हाण यांच्या हस्ते झाले. ध्वज संचालन माध्यमिक शिक्षक सुधीर शेंडे यांनी केले. मानवंदना क्रीडा शिक्षक अभय कांबळे यांनी दिली. भारत माता वेशभूषा धारण करणारी इयत्ता दहावीची सपना वड्डे सर्वांचे आकर्षण ठरली.

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष देवराव नैताम, उपाध्यक्ष प्रकाश नरोटे, सदस्य गजानन वड्डे, शालीकराव मडावी, उच्च माध्यमिक शिक्षक एम. ई. ठाकूर, टी. ए. आस्कर, सी. डी. नळे, पद्मावती महेशगौरी, माध्यमिक शिक्षक वर्षा मस्के, व्ही. एस. देसू, पदवीधर प्राथमिक शिक्षिका चंदा कोरचा, प्राथमिक शिक्षक रविकांत पिपरे, व्ही. एम. नैताम, आय. एम. कुमरे, कविता बारसागडे, संगीता पुराम,अधीक्षक जी. एस. सानप, करिष्मा गोवर्धन, सुनिता दुर्कीवार, संगीता करंगामी, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी, नागरिक, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.