Home गडचिरोली शिक्षकांना लवकरात लवकर अनुदानित टप्पा लागू करण्यात यावा

शिक्षकांना लवकरात लवकर अनुदानित टप्पा लागू करण्यात यावा

148

– आमदार अभिजीत वंजारी यांची शिक्षणमंत्री केसरकर यांच्याकडे मागणी

विदर्भ क्रांती न्यूज

नागपूर : शालेय शिक्षण विभागा अंतर्गत मागील काळात अंशतः अनुदानित वर आलेल्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शालेय शिक्षकांना टप्पा वाढ करण्याचा निर्णय शासन स्तरावर प्रलंबित असून 20 %, 40 % व त्या पुढील टप्पा वाढ राज्यातील शिक्षकांना लवकरात लवकर लागू व्हावा याकरिता नागपूर पदवीधर मतदारसंघाचे आमदार अभिजीत वंजारी यांनी शालेय शिक्षण मंत्री ना. दीपक केसरकर यांच्या मंत्रालयीन दालनात भेट घेतली.

यावेळी शालेय शिक्षण उपसचिव समीर सावंत हेही उपस्थित होते. उपसचिव यांच्या माहितीनुसार शिक्षण आयुक्त कार्यालयातून टप्पा वाढीकरिता पात्र असलेल्या शिक्षकांची यादी अहवालासह मागविण्यात आला आहे. त्यावर माननीय मंत्री महोदय दीपक केसरकर यांनी आयुक्तालयामार्फत यादीसह अचूक अहवाल आल्यानंतर कॅबिनेट बैठकीच्या माध्यमातून टप्पा वाढचा निर्णय लवकरात लवकर घेण्यात येईल, असे आश्वासन दिले.

error: Content is protected !!