विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित विविध सेवाभावी उपक्रमांनी भाजपा गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचा वाढदिवस साजरा झाला.
सर्वप्रथम सेमाना देवस्थानात दर्शन घेऊन पुजापाठ करण्यात आली. यादरम्यान एकता निवासी मूकबधिर विद्यालय नवेगाव गडचिरोली येथील विद्यार्थ्यांसोबत केक कापून व विद्यार्थ्यांना बुक, पेन सोबत फळ, बिस्किट व नाश्ता देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालय कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे रुग्णांना फळ व बिस्कीट वाटप करण्यात आले.

कार्यकर्त्यांनी केलेल्या प्रेमाचा सदैव ऋणी राहणार : प्रशांतजी वाघरे
भाजपा युवा मोर्चाच्या वतीने आयोजित भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांचा अभिष्टचिंतन सोहळा शासकीय विश्रामगृह कॉम्प्लेक्स गडचिरोली येथे पार पडला.
सोहळ्याला उपस्थित मान्यवरांनी प्रशांतजी वाघरे यांना शुभेच्छा देत त्यांचा राजकीय जीवनातील कारकीर्द कार्यकर्त्यांना सांगितले. त्याप्रसंगी लोकसभा समन्वयक तथा ज्येष्ठ नेते प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुधाकर यनगंदलवार, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा सचिव अनिलजी कुनघाडकर, वर्षाताई शेडमाके यांनी प्रशांतजी वाघरे यांच्या राजकीय कारकीर्दीबदल माहीत देत शुभेच्छा दिल्या.
जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी सोहळ्याप्रसंगी बोलताना सांगितले की, भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांनी माझ्यावर भरभरून प्रेम केले. मी आज जिल्हाध्यक्ष पदावर आहे याचा श्रेय माझ्या लाखो कार्यकर्त्यांना जातो. कारण पक्ष मजबूत करण्यामध्ये खूप मोठा वाटा भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आहे व मी जिल्हाध्यक्ष माझ्या कार्यकर्त्यांनी केलेल्या एक निष्ठेच्या कार्यामुळे झालो. पूरपरिस्थितीमध्ये शेतकऱ्यांच्या खूप मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले. शेतकऱ्यांमध्ये आक्रोश व निराशा आहे. त्यामुळे आपण वाढदिवस बॅनर किंवा कोणते मोठे कार्यक्रम करून न घेण्याचा निर्णय घेतला. परंतु युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी छोटासा सेवाभावाचा उपक्रम राबवून कार्यक्रम घेतला. त्यामध्ये रुग्णांना फळ वाटप, एकता निवासी मूकबधिर विद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना पेन्सिल, बुक व फळ वाटपचा कार्यक्रम घेतला. त्यामुळे संपूर्ण कार्यकर्त्यांचा व माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेचा मी सदैव ऋणी राहणार, असे प्रतिपादन भाजपा जिल्हाध्यक्ष प्रशांतजी वाघरे यांनी केले.
त्याप्रसंगी लोकसभा समन्वयक प्रमोदजी पिपरे, जिल्हा उपाध्यक्ष तथा ज्येष्ठ नेते सुधाकरजी येनगंदलवार, जिल्हा महामंत्री योगिताताई पिपरे, जिल्हा सचिव तथा माजी न. प. उपाध्यक्ष अनिलजी कुनघारकर, ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अनिलजी पोहनकर, महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष गीताताई हिंगे, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष अनिलजी तिडके, विजयजी चाटे, शहर महामंत्री केशवजी निंबोड, जिल्हा सचिव वर्षाताई शेडमाके, महिला मोर्चा जिल्हा महामंत्री सीमाताई कन्नमवार, त्रिषा डोईजड, युवा मोर्चा जिल्हा महामंत्री आशिष रोहनकर आशिष कोडापे, मधुकर भांडेकर, मंगेश रणदिवे, सावली तालुक्यातील पदाधिकारी किशोर वाकुडकर, विनोदभाऊ धोटे, सुरज किनेकर, जितु सोनटक्के, विशाल कारंडे, गितेश चिताडे, दीपक सातपुते, गणेश दहलकर व युवा मोर्चाचे पदाधिकारी, कार्यकर्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.







