Home गडचिरोली विश्व हिंदू परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी सुशील हिंगे यांची निवड

विश्व हिंदू परिषदेच्या गडचिरोली जिल्हा अध्यक्षपदी सुशील हिंगे यांची निवड

99

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : विश्व हिंदू परिषद (विदर्भ) प्रांत बैठक स्मृती भवन रेशिमबाग नागपूर येथे 9, 10, 11 ऑगस्ट 2024 ला संपन्न झाली.

या बैठकीमध्ये विश्व हिंदू परिषदेचे गडचिरोली जिल्हा अध्यक्ष म्हणून सुशील हिंगे यांची घोषणा करण्यात आली. त्यांचा अनुभव व कार्याचा विचार करून ही जबाबदारी त्यांना देण्यात आली.

या पदाला निश्चितच न्याय देऊ व या पदाची गरिमा वाढविण्याचा प्रयत्न करू, असा विश्वास नवनियुक्त जिल्हा अध्यक्ष सुशील हिंगे यांनी व्यक्त केला व सर्वांचे आभार मानले. या निवडीबद्दल विभाग मंत्री, जिल्हा मंत्री व समस्त जिल्हा कार्यकारिणी पदाधिकाऱ्यांनी सुशील हिंगे यांचे अभिनंदन केले.

error: Content is protected !!