Home गडचिरोली राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यानी लाभ घ्यावा

राज्य सरकारच्या कल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यानी लाभ घ्यावा

89
Oplus_0

– शासकीय योजनांची अंमलबजावणी शुभारंभ कार्यक्रमात इंजि. प्रमोदजी पिपरे यांचे आवाहन

– आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचा शुभारंभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेन्द्रजी फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यात कल्याणकारी शासकीय योजनांची अंमलबजावणी सुरु आहे. इमारत बांधकाम कामगार कल्याण योजना, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना तसेच केंद्र सरकारची प्रधानमंत्री सुर्यघर मोफत वीज योजना या सर्व कल्याणकारी योजनांचा पात्र लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहन लोकसभा समन्वयक इंजि. प्रमोदची पिपरे यांनी केले.

शासकीय योजनांची अंमलबजावणी शुभारंभ कार्यक्रमाचे आयोजन स्थानिक विवेकानंदनगर राम मंदिर सभागृह येथे करण्यात आले होते. गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवरावजी होळी यांच्या हस्ते कार्यक्रमाचे शुभारंभ करण्यात आले.

याप्रसंगी प्रामुख्याने भाजपा जिल्हा महामंत्री तथा माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, शहर अध्यक्ष मुक्तेश्वर काटवे, शहर महामंत्री विवेक बैस, शहर महामंत्री विनोद देवोजवार, देवाजी लाटकर, प्रा. अरुण उराडे, माजी नगरसेविका लताताई लाटकर, जिल्हा सचिव साईनाथ बुरांडे व पात्र लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी एमएलए कॅम्पच्या माध्यमातून लाभार्थ्यांचे फार्म भरण्यात आले.

error: Content is protected !!