Home गडचिरोली जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन

जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमाचे आयोजन

162

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली: एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प गडचिरोलीच्या वतीने येथील शासकीय इंग्रजी माध्यम आश्रमशाळेत जागतिक आदिवासी दिन व गौरव सोहळा कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार, ९ऑगस्ट रोजी सकाळी १० वाजता केलेले आहे.

या कार्यक्रमाला राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत. यावेळी गडचिरोली-चिमूर लोकसभा निर्वाचन क्षेत्राचे खासदार डॉ. नामदेव किरसान यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे. प्रमुख अतिथी म्हणून विधान परिषद सदस्य आमदार अभिजीत वंजारी, विधान परिषद सदस्य आमदार सुधाकर अडबाले, गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी, आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार कृष्णा गजबे उपस्थित राहणार आहेत.

विशेष निमंत्रित म्हणून जिल्हाधिकारी संजय दैने, जिल्हा पोलीस अधीक्षक निलोत्पल, जिल्हा परिषदच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत, असे सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी राहुलकुमार मीना यांनी कळविले आहे.

error: Content is protected !!