Home गडचिरोली सामान्य रुग्णालयाच्या विशाखा समितीवर वर्षा शेडमाके यांची निवड

सामान्य रुग्णालयाच्या विशाखा समितीवर वर्षा शेडमाके यांची निवड

121

– अध्यक्षपदी डॉ. माधुरी किलनाके तर सचिवपदी डॉ. मनीष मेश्राम

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : सामान्य रुग्णालय गडचिरोली येथे विशाखा समितीचे पुर्नगठण करण्यात आले आहे. या समितीवर सदस्यपदी सामाजिक कार्यकर्त्या वर्षा शेडमाके यांची निवड करण्यात आली आहे.

या समितीच्या अध्यक्षपदी सामान्य रुग्णालय गडचिरोलीच्या सर्जन (वर्ग १) डॉ. माधुरी किलनाके, सचिवपदी श्वसनविकार तज्ञ डॉ. मनीष मेश्राम, सदस्यपदी वैद्यकीय अधिकारी (वर्ग २) डॉ. मुकूंद ढबाले, सहाय्यक अधिसेविका आशा बावणे, विधी समूपदेशक तृप्ती राऊत, समाजसेवा अधीक्षक (मनोविकृती) राजेश नागापुरे, अर्श समन्वयक विशाखा काटोले, पाठ्यनिर्देशिका मेघा कुलसंगे, कनिष्ठ लिपीक वंदना लाळे, महिला शिपाई मोनिका नारनवरे यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल समितीमधील सर्व सदस्यांचे अभिनंदन होत आहे.

error: Content is protected !!