– शिवसेना (उबाठा) सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांचा वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून विविध उपक्रमांनी साजरा
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे व मा. माँसाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) चे जिल्हा सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार यांची वाटचाल सुरू आहे. गरजवंतांच्या मदतीला धावून जाणे व त्याला आधार देणे, यापासून मिळणारा आनंद हा अनमोल असतो. त्यामुळे अरविंदभाऊ कात्रटवार यांनी आपला वाढदिवस सेवाभाव दिन म्हणून साजरा केला. वाढदिवसानिमित्य विविध क्षेत्रातील शेकडो मान्यवरांनी अरविंदभाऊ कात्रटवार यांच्या जनसंपर्क कार्यालयात जावून शुभेच्छा वर्षाव केला. याप्रसंगी शिवसैनिक मोठ्या संख्येने शिवसैनिक उपस्थित होते.
शिवसैनिक व विविध राजकिय-सामाजिक क्षेत्रातील काँग्रेसचे नेते प्रा. समशेर पठाण, काँग्रेस नेते सतिश विधाते, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते प्रकाशभाऊ ताकसांडे, नदिमभाई नाथानी, सुनिल डोगरा, मनोज पवार, अनिल बजाज, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, नवनाथ उके, संजय बोबाटे, संदिप भुरसे यासह शेकडो मान्यवरांनी शुभेच्छांचा वर्षाव केला.
बैल दगावलेल्या शेतकऱ्याला दिला आधार
जिल्ह्यात सध्या संततधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील शेतकरी लालाली लोहंबरे यांचा गुरांचा गोठा कोसळला. गोठा बैलांच्या अंगावर कोसळल्याने एका बैलाचा मृत्यू झाला. ऐन शेतीच्या हंगामात बैल दगावल्याने शेतीची कामे कशी करावी, अशी समस्या निर्माण झाली. दुसरा बैल खरेदी करण्यासाठी वेळेवर पैशाची जुळवाजुळव कशी करावी या चिंतेत सापडले. याबाबतची माहिती अरविंदभाऊ कात्रटवार यांना मिळताच आपल्या वाढदिवसाचे औचित्य साधून मोहटोला येथील शेतकरी लालाजी लोहंबरे यांच्या घरी भेट दिली. संकट काळात त्यांना बैल खरेदीसाठी आर्थिक मदत देऊन सामाजिक बांधीलकीचे दर्शन घडविले.

बौध्द विहारास भांडे वाटप व एक हजार वृक्ष लागवड
अरविंदभाऊ कात्रटवार यांनी सर्वधर्मसमभावाची भावना जोपासत आपल्या वाढदिवसानिमित्य मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रातील गिलगाव येथील बौध्द बांधवांचे श्रध्दास्थान असलेल्या बौध्द विहारास भांडी भेट देऊन सेवाभावाचे दर्शन घडविले. त्याचबरोबर झाडे लावा-झाडे जगवा आणि पर्यावरणाचे रक्षण करा, असा संदेश देत मौशीखांब-मुरमाडी जिल्हा परिषद क्षेत्रात तब्बल एक हजार वृक्षलागवड करण्यात आली.
जनसेवक म्हणून अहोरात्र धडपडणार : अरविंदभाऊ कात्रटवार
शिवसेना प्रमुख हिंदु हृदयसम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांचा आदर्श जोपासून मा. उध्दवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात आपली राजकीय व सामाजिक वाटचाल सुरू आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाने राजकारणापेक्षा समाजकारणाला अधिक महत्व दिले आहे. जनतेच्या समस्या सोडवून त्यांना न्याय मिळवून दिल्यानंतर जनसेवेतून मिळणारा आनंद अलौकीक आहे, मा. बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक म्हणून जनकल्याणासाठी आपले कार्य अविरत सुरू आहेत. जनतेचा सेवक म्हणून जनतेच्या मदतीसाठी अहोरात्र धडपड करण्यास सदैव तत्पर आहे, असे प्रतिपादन अरविंदभाऊ कात्रटवार यांनी कार्यक्रमाप्रसंगी केले. वाढढिवसानिमित्य शेकडो हितचिंतक, स्नेहगण व शिवसैनिकांकडून मिळालेल्या शुभेच्छांमुळे काम करण्यास अधिक बळ मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
याप्रसंगी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गडचिरोली उपतालुका प्रमुख यादवजी लोहंबरे, संजय बोबाटे, संदिप भुरसे, अमित बानबले, दिलीप चनेकार, चुडाराम मुनघाटे, प्रशांत ठाकुर, विलास दासगाये, गोपाल मोगरकर, विलास वासेकर, स्वप्निल धोडरे, चंद्रभान नैताम, तुषार बोरकर, खुशाल आवारी, सचिन भरणे, विजय भरणे, उमाकांत हर्षे, कैलाश फुलझेले, गौरव हर्षे, हरिदास हर्षे, हरबाजी दासगाये, तानबा दासगाये, रामदास बह्याल, निकेश लोहंबरे, प्रविण निसार, नेपाल लोहंबरे, मिथुन चापडे, जीवन कुरटकार, यादव चौधरी, शिवम लोहंबरे, जीवन कुकडकार, अंबादास मुनघाटे, दिलीप वेलादी, निकेश मडावी, विनोद मुत्यमवार, स्वप्निल मोदेकर, रमेश चौधरी, मोहन सोरते, हिवराज वाकडे, रविंद्र सावसाकडे, प्रेमदास जांभुळकर, बालाजी बाबनवाडे, अनिल दोडके, प्रकाश नागपूरे, निलकंठ रणदिवे, बापू भादे, पांडूरंग धानफोले, सुरेश मसराम, मंगेश कांबडी, सुधाकर सावसागडे, राजू जवादे, अरुण बारापात्रे, संजय मेश्राम, दशरथ चापडे, रत्नाकर रंधये, उमाजी चनेकार, वसंत आभारे, रमेश सिडाम, मयुर भोयर, महेश लाजुरकर, अंकुश झाडे, पंकज चनेकार, खुशाल मेश्राम, प्रांजल कोलते, पराग कुमरे, पुरुषोत्तम चनेकार, दुर्वेश मुनघाटे, सुभाष देशमुख, भाऊराव मुनघाटे, गुरुदेव गोहणे, कुणाल पेंदाम, अमर निंबोड, अनंत हुलके, राहुल मडावी, भक्तदास खेवले, सुरज टेकाम, गुरुदेव सेलोटे, कवळूजी धंदरे, गणेश खेवले, सचिन भरणे यासह शेकडो शिवसैनिक व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.







