– जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांना निवेदन सादर
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : पेसा क्षेत्रातील रिक्त पदांसाठी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांना नियुक्ती देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुशिक्षित बेरोजगार उच्च विद्याविभूषित बेरोजगार शिक्षक तरुण व तरुणी असताना हा निर्णय घेण्यात आला हा त्यांच्यावर अन्याय करणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना हे शिक्षक शिकवणार आहेत त्यांच्यावर पण अन्याय करणार आहे. त्याला लगेच मागे घ्यावा व सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे यांनी केली आहे.
शासनाने पदवीधरांना विद्यावेतन देण्याचा निर्णय एकाबाजूला घेतला असताना, दुसऱ्या बाजूला अश्याप्रकारे सुशिक्षित बेरोजगार युवक व युवतींवर अन्याय करणारा निर्णय घेऊन अन्याय करणारा निर्णय तात्काळ मागे घ्यावा व सुशिक्षित बेरोजगारांना न्याय द्यावा, अशी विनंतीही डॉ. मिलिंद नरोटे यांनी निवेदनाद्वारे केली आहे.
या मागणीचे निवेदन जिल्हा परिषद गडचिरोलीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यांच्याकडे डॉ. मिलिंद नरोटे यांच्या नेतृत्वात देण्यात आले. निवेदन देताना भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष तथा भाजपा आदिवासी आघाडीचे जिल्हा प्रभारी डॉ. मिलिंद नरोटे यांच्यासह पंकज सोमणकर, उमेश उईके, स्वप्निल मडावी, शुभम उईक, सुरज मडावी, मयूर कोडपे, तुषार चुधरी आदी कार्यकर्ते उपस्थित होते.







