– आमदार कृष्णा गजबे यांची डीआरएमकडे मागणी
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : देसाईगंज शहरातील वाहतुकीसाठी नागरिकांना सोयीचे होण्यासाठी रेल्वे प्रशासनाद्वारे तयार करण्यात आलेला अंडर ब्रिज हा नागरिकांसाठी डोकेदुखिचा विषय बनला असून रेल्वे प्रशासनाने पाण्याच्या निकासीसाठी तातडीने उपाय योजना करावी, अशी मागणी आरमोरी विधानसभा क्षेञाचे आमदार कृष्णा गजबे यांनी रेल्वे प्रशासनाकडे केली.
देसाईगंज शहर हा रेल्वेच्या सोयीमुळे रस्त्याच्या दोन भागात विभागला गेला असून रेल्वे वाहतुकीच्या वर्दळीमुळे रेल्वे फाटकेजवळ नागरिकांना आवागमणासाठी ताटकळत उभे राहावे लागत होते. यावर उपाय योजना म्हनुण अंडर ब्रिज तयार करण्यात आले. नगर परिषद देसाईगंजने विशेष ठराव घेवुन देखभाल दुरुस्तीसह विद्युत पुरवठ्याचीही हमी घेतली. रेल्वे प्रशासनाने अतिरिक्त साचलेल्या पाण्याच्या निकाशी साठी वॉटर लिफ्टिंग जनरेटर लावुन देण्याची हमी घेतली असतांना रेल्वे अंडरब्रिज तयार होऊन जवळपास ८ वर्षाचा कालावधी लोटुनही रेल्वे प्रशासनाने वॉटर लिफ्टिंग जनरेटर ची सुविधा करुन न दिल्याने रहदारित ञास सहन करणाऱ्या नागरिकांकडुन निर्माण होणाऱ्या रोशाला नगर प्रशासनालाच सामोरे जावे लागत आहे.
सद्या रेल्वे स्थानकावर कोट्यावधिचे विकासकामे सुरु असून पाण्याचा निचरा करण्याची कोणतीही सुविधा रेल्वे प्रशासनाद्वारे करण्यात आलेली नाही. साधारण पावसामुळेही बोगद्यात कंबरेच्या वर पाणि साचत असुन त्याच्या निकासीकरिता पर्याप्त सुविधा उपलब्ध नसल्याने रेल्वे प्रशासनाने दिलेल्या हमी प्रमाणे वॉटर लिफ्टिंग जनरेटरची तत्काळ सुविधा करुन द्यावी, अशी मागणी आमदार कृष्णा गजबे यांनी मुख्य रेल्वे प्रबंधक नम्रता ञिपाठी यांना भ्रमणध्वनीच्या माध्यमातून केली.
साचलेल्या पाण्यामुळे नागरिकांची होणारी गैरसोय याचे चिञणही या प्रसंगी व्हिडीओ च्या माध्यमातुन मुख्य रेल्वे प्रबंधकांना पाठविण्यात आले. बोगदा बांधकाम करताना रेल्वे प्रशासनाने वॉटर लिफ्टींग जनरेटर बसवुन देण्याचे रेल्वे विभागाने दिलेले हमीपञही देसाईगंज न. प. मुख्य अधिकारी डॉ. कुलभुषन रामटेके यांनी डिएमओ यांना व्हॉट्सऐप द्वारे पाठविले. याप्रसंगी देसाईगंज न.प. चे माजी उपाध्यक्ष मोतीलाल कुकरेजा यांच्यासह भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजुभाऊ जेठानी, सोपालजी अग्रवाल व नागरिक उपस्थित होते.







