Home गडचिरोली गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत चलो वार्ड अभियानाला’ सुरुवात

गडचिरोली जिल्हा युवक काँग्रेसतर्फे ‘चलो पंचायत चलो वार्ड अभियानाला’ सुरुवात

96

विदर्भ क्रांती न्यूज

गदचिरोली : चामोर्शी तालुक्यातील नवेगाव माल येथे महाराष्ट्र युवक काँग्रेस सचिव ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांच्या नेतृत्वात ‘चलो पंचायत चलो वार्ड पंचायत भरवण्यात आली. यावेळी गावातील प्रत्येक माणसाच्या समस्या ऐकूण रोडची समस्या असेल, घरकुलाची समस्या सर्वसामान्य जनतेच्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्याचे काम ॲड. विश्वजित मारोतराव कोवासे यांनी केले.

यावेळी जिल्हा युवक काँग्रेसचे अध्यक्ष नितेश राठोड, राहूल पोरटे, उपसरपंच चरणदासजी चौधरी, नवेगाव माल येथील माजी उपसरपंच नंदू रायसिडाम, दिलीप वनकर, सुनील कोहपरे, संतोष दिघोरे, वासुदेव चौधरी, होमदेव लाटेलवार, विकास वाडघुरे, सुरेश कुकुडकर, विशाल कोहपरे, तुमदेव पिठाले, जिगर पिठाले, तेजस कोंडेकर आणि मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

error: Content is protected !!