शिवसेना जिल्हा समन्वयकपदी किरण पांडव यांची नियुक्ती

373

गडचिरोली : शिवसेना पक्षप्रमुख तथा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशान्वये गडचिरोली जिल्हा शिवसेना प्रभारी समन्वयकपदी किरण पांडव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लक्षात घेता ही नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांनी केलेल्या कार्याचा आढावा घेऊन नियुक्ती कायम करण्यात येईल, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकातून देण्यात आली आहे.