धार्मिक कार्यामुळे माणसाचे आचार-विचार संस्कारित होतात : खासदार अशोक नेते यांचे प्रतिपादन

136

– गांगलवाडी येथील भागवत सप्ताहाचा समारोप

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : चंद्रपूर जिल्ह्यातील गांगलवाडी येथे हनुमान मंदिर देवस्थानाच्या वतीने श्रीमद् भागवत सप्ताह समारोपिय कार्यक्रम शनिवार दिनांक 16 एप्रिल 2022 रोजी हनुमान मंदिर देवस्थान येथे पार पडला.
मानवाने वैज्ञानिक दृष्ट्या प्रगती केली असली तरी मानवी जीवनाला आवश्यक असणारी मनःशांती फक्त धार्मिक कार्यानेच प्राप्त होते. भागवत धर्मामुळे चांगले विचार,चांगले आचार यांचे संस्करण होत असते. त्यामुळेच भागवताचे समाजामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे भागवताचे कार्यक्रम गावागावात आयोजित करून प्रत्येक गावाने सुख, शांती आणि समृद्धी वृद्धिंगत करावे व आपले जीवन सफल करावे, असे आवाहन खासदार अशोकजी नेते यांनी केले. यावेळी माजी आमदार अतुलभाऊ देशकर आणि माजी सभापती रामलाल दोनाडकर यांनी सुद्धा मनोगत व्यक्त करून ग्रामवासीयांना शुभेच्छा दिल्या.
गोपाल काल्याच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार खासदार अशोकजी नेते तसेच ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्राचे माजी आमदार प्रा. अतुलभाऊ देशकर तसेच कृष्णाभाऊ सहारे माजी उपाध्यक्ष जि. प. चंद्रपूर, रामलाल दोनाडकर माजी सभापती ब्रह्मपुरी, वंदनाताई शेंडे माजी सभापती, प्रा. अशोकजी सालोटकर अध्यक्ष भाजपा ओबीसी आघाडी ब्रह्मपुरी शहर, प्रभाकरजी सेलोकर कार्याध्यक्ष तालुका काँग्रेस कमिटी, ब्रम्हपुरीचे “जीवन गौरव पुरस्कार प्राप्त डॉ. गोकुल बालपांडे, किरण समर्थ आणि सौ. समर्थ आरमोरी, अनिल तिजारे सरपंच तळोधी, गिरीधर ठाकरे उपसरपंच डोर्ली, उमेश घुले सरपंच मुई, देवराव नन्नावरे उपसरपंच मुई, विवेक बनकर सरपंच गांगलवाडी, सुजित बालपांडे, विलास वाकुडकर, धनराज सातपुते, भाऊरावजी ठवकर, पांडुरंगजी भोयर, गिरीधरजी ठाकरे उपसरपंच, प्रा. राजेंद्र दोनाडकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांच्या हस्ते हनुमान मंदिराची पायाभरणी करणारे सेवानिवृत्त शिक्षक सन्माननीय वामनरावजी भोयर, गुलाबराव चिमूरकर, मूर्तिकार ढोरे बोरगाव, निबंध स्पर्धेत पहिला आलेला प्रेम संजय भोयर, पुजारी गुरुदेव मेश्राम यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि संचालन ज्ञानेश्वरजी भोयर माजी सरपंच गांगलवाडी यांनी केले तर आभार संजयजी भोयर ग्रा. पं. सदस्य यांनी मानले.