धानोरा नगरपंचायत उपाध्यक्ष ललित बरछा यांच्या वाढदिवशी 27 जणांनी केले रक्तदान

69

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : जिल्हा रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. यामुळे सामाजिक बांधिलकी जपत सामाजिक कार्यकर्ते तथा धानोरा नगरपंचायतीचे उपाध्यक्ष तथा बांधकाम सभापती ललित बरछा यांचा वाढदिवस 1 एप्निल 2022 ला धानोरा येथील कृषी भवनमध्ये रक्तदान करुन साजरा करण्यात आला. वाढदिवसाच्या निमित्ताने आयोजित या शिबिरास उत्स्फूर्त प्रतिसाद देत तब्बल २७ जणांनी रक्तदान केले.

यावेळी धानोराच्या नगराध्यक्ष पौर्णिमा सयाम, माजी जि. प. उपाध्यक्ष मनोहर पोरेटी, सभापती कालिदास मोहुर्ले, सभापती माणिकशहा मडावी, सभापती सिमा कोटांगे, नगरसेवक अल्का मशाखेत्री, देवांगणी चौधरी, कल्याणी गुरनुले, यामीना पेंदाम, सुषमा भुरसे, नरेश चिमूरकर, प्रदिप बोगा, भूषण उंदिरवाडे, स्विकृत नगरसेवक मल्लीक बुधवाणी, डॉ. दिलीप बर्वे, अक्षय भिष्णूरकर, नयन फुलझले, निशांत देशमुख, प्रमोद सहारे, भूषण फरांडे आदी मित्र परिवार व अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत रक्तदान शिबिराचा शुभारंभ करण्यात आला.

रक्तदान हेच श्रेष्ठ दान या म्हणीप्रमाणे रक्तामुळे माणसाला जिवनदान मिळते .रक्ताचा तुटवडा भासू नये आणि गरजूना रक्त उपलब्ध व्हावा, यासाठी हा रक्तदानचा अभिनव उपक्रम राबविण्यात आला. कोरोनाच्या काळातील रक्ताचा तुटवडा पाहता, रक्तदानाचा उपक्रम महत्वाचा ठरतो. वाढदिवसाला उत्स्वी रुप न देता रक्तदानसारख्या प्रवित्र कार्यामधून कार्यकर्त्यांनी उपाध्यक्ष ललिता बरछा यांना शुभेच्छा दिल्या. वाढदिवसानिमित्त आयोजित महारक्तदान शिबिरामध्ये २७ लोकांनी उत्स्फुर्तपणे रक्तदान केले. यात तरूणाईचा सहभाग लक्षणीय होता.