युवकांनी प्रभु रामचंद्राचा आदर्श घ्यावा : भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे

90

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : प्रभु रामचंद्रासारखा राजा, मातृ-पितृवचनी पुत्र आणि एकवचनी पुरूष कधीच होवु शकत नाही. म्हणून युवकांनी प्रभुरामचंद्राचा आदर्श घ्यावा, असे प्रतिपादन भाजपा जिल्हा महामंत्री प्रमोद पिपरे यांनी श्रीराम नवमीनिमित्त इंदिरानगर येथे प्रभु रामचंद्राच्या प्रतिमेला हारार्पण करताना केले.
श्रीरामनवमी उत्सवानिमित्त श्रीराम सेवा समितीच्या वतीने शहरात मुख्य शोभायात्रा काढण्यात आली. नगरपरिषद परिसरातून शोभायात्रेचा शुभारंभ करण्यात आला व इंदिरा गांधी चोकात समारोप करण्यात आला. तसेच लांजेडा, इंदिरा नगर, हनुमान वार्ड येथून हनुमान मंदिरातुन तर रामनगर येथील राममंदिरातुन तसेच शहरातील अनेक वार्डामध्ये शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेमध्ये प्रमोदजी पिपरे आवर्जून उपस्थित राहून प्रभु रामचंद्राच्या प्रतिमेला हारार्पण केले.
शोभायात्रेत आमदार डॉ. देवराव होळी, माजी नगराध्यक्ष योगीताताई पिपरे, भाजपा जिल्हा महामंत्री गोविंद सारडा, जिल्हा संघचालक घिसुलाल काबरा, नप माजी उपाध्यक्ष अनिल कुनघाडकर, हर्षल गेडाम, सुभाष उप्पलवार, बंटी खडसे, निखिल चरडे, स्वप्नील खांडरे आदी उपस्थित होते.