विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : जनतेला खोट्या आश्ववासनाचे गाजर दाखवुन 2014 पासून नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भाजप सत्तेत आली तेव्हा पासून सातत्याने महागाईत वाढ करून सामान्य जनतेची लूट करत आहे. पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीवेळी पराभवाच्या चिंतेने पेट्रोल, डिझेल, गॅस सिलिंडर च्या किमती रोखून धरल्या होत्या. परंतु निवडणूक संपताच पुन्हा दरवाढ करून जनतेस लुटण्यास सुरुवात केली आहे. मागील पाच दिवसात पेट्रोल, डिझेलमध्ये दररोज 80 पैशाने वाढवत 3.20 रुपयांची वाढ केली तर LPG गॅस सिलिंडर 50 रुपयांनी महाग केला असून तो आता काही ठिकाणी 1000 रुपयांच्या वर गेला आहे. सोबतच खाद्यतेल व इतर जीवनावश्यक वस्तूंच्या दरातही मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने सर्वसामान्यांचे जगणे कठीण झाले आहे.
इंधन दरवाढीमुळे महागाई प्रचंड प्रमाणात वाढली आहे. जनतेची खुलेआम लूट सुरू आहे. पण केंद्रातील सरकार मात्र डोळे झाकून बसले आहे. जनतेला लुटणाऱ्या व सर्वसामांण्याच्या मेहनतीच्या कमाईवर डाका टाकणाऱ्या या केंद्रातील भाजप सरकारच्या विरोधात आवाज उठवुन सरकार ला जागे करण्या करिता पक्षाध्यक्ष श्रीमती सोनियाजी गांधी यांच्या मार्गदर्शनाखाली व प्रांताध्यक्ष मा. नानाभाऊ पटोले यांच्या सूचनेनुसार सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी 31 मार्च 2022 रोजी आपापल्या घरी गॅस, सिलिंडर व दुचाकी वाहणांना फुलांचा हार घालून केंद्र सरकार विरोधात आंदोलन करायचे आहे. तर 1 एप्रिल 2022 रोजी दुपारी 12 वाजता इंदिरा गांधी चौकात एक दिवशीय धरणे आंदोलन करून केंद्रातील हुकूमशाही सकार विरोधात आंदोलन करण्यात येणार असून जिल्ह्यातील सर्व काँग्रेस नेते, सर्व सेलचे अध्यक्ष, पदाधिकारी, कार्यकर्ते व महागाईत शोषण होत असलेल्या सामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांनी जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी व नागरिकांना केले आहे.