चांंभार्डा येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी व डान्स ग्रुप कार्यक्रमाचे आयोजन 

131

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : गड़चिरोली तालुक्यातील चांंभार्डा येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने लावणी व डान्स ग्रुप या कार्यक्रमाचे आयोजन 17/03/2022 रोजी करण्यात आले होते. वर्षभर बळीराजा शेतात राबतो शेतीची मळनी होताच ग्रमीण भागात जनतेच्या मनोरंजनासाठी संस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यांच्याच एक भाग म्हणुन आज चांंभार्डा येथे सावित्रीबाई फुले महिला मंडळ यांच्या सौजन्याने “लावणी व डान्स ग्रुप” या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्धघाटक शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार हे होते. याप्रसंगी उपस्थित प्रमुख पाहूूने म्हणुन लाभलेले अम्बादे, कविश्वर बनपूरकर, यादवजी लोहबरे, कोटांगले, धनराज खेवले, दिलीप नावघडे, हरिजी घुबड़े, पांडुरंग समर्थ, फुलझे, भोयर, तसेच सावित्रीबाई फुले महिला मंडळ चांंभार्डाचे सदस्य अर्चना लड़के, शोभा लाजुरकर, दीपाली ठाकरे, वैशाली फुकटे, नगीना कोटगले, वैशाली सुरपाम, जोती कोलते, छोटी पाल, धनेश्वरी चनेकर यांच्यासह गवकारी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.