माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे “जिवन सन्मान” पुरस्काराने सन्मानित

87

– भारतीय मानवाधिकार परिषद आयोगाकडून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचरोली :  स्थानिक पत्रकार भवन येथे दि. १३ मार्च रोजी भारतीय मानवाधिकार परिषदेच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा जीवन सन्मान कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांचा मानवाधिकार परिषदेचे संस्थापक तथा अध्यक्ष अविनाश मोकाशी यांच्या हस्ते जीवन सन्मान पुरस्कार देवुन सन्माणित करण्यात आले.
कार्यक्रमाला प्रमुख अथिति म्हणून श्री. गुरुदेव सेवा मंडळाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे,भारतीय मानवाधिकार परिषद संचालिका प्रीती मोकाशी,प्रा. डॉ. सविता सादमवार,माजी प्राचार्य पंडित पुडके,ऑड. कविता मोहोरकर उपस्थित होते.
माजी नगराध्यक्ष सौ. योगिताताई पिपरे यांनी बेटी बचाव बेटी पढाव कार्यक्रम,कोराना काळात झोपडपट्टीतील गरीब,लघू उदयोग धंदे,सायकल रिक्षा व घरगुती काम करणाऱ्या कामगार,महिला मजूर यांना मदतीता हात,जिल्हा सामान्य रुग्णालय येथे रुग्नांच्या नातेवाईकांना मोफत भोजन,गडचिरोली शहरात व जिल्ह्यात सामाजिक उपक्रमाच्या माध्यमातून मदत. (उदा.कोरोना काळात विधवा झालेल्या महिलांना मदत तसेच या महिलांच्या मुला-मुलींच्या लग्नकार्यात सहकार्य करणे) असे अनेक उल्लेखनीय कार्य केलेली आहेत.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हिना मेश्राम यांनी केले तर आभार भारतीय मानवाधिकार परिषदेचे प्रदेश अध्यक्ष गजेंद्र डोमळे यांनी मानले.