कुसुमताई भोयर यांना हिरकणी पुरस्कार प्रदान

93

विदर्भ क्रांती न्यूज

गडचरोली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने दरवर्षी क्रीडा, शिक्षण, समाजकारण, संशोधन, अर्थकारण, राजकारण व प्रशासकीय सेवा आदी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांना डॉ. पंजाबराव देशमुख राष्ट्रीय शिक्षक परिषदेच्या वतीने दिला जाणारा “हिरकणी पुरस्कार 2022” या वर्षी गडचिरोली जिल्ह्यातून सौ कुसुम राधेश्याम भोयर यांना जागतिक महिला दिनी जाहीर झाला.सौ कुसुम भोयर यांनी अगदी विषम परिस्थितीत घरच्यांना न जुमानता आपले शिक्षण पूर्ण करून शिक्षिकेची नोकरी मिळविली. सध्या त्या नोकरी सोबतच व्यसनाच्या आहारी गेलेल्या लहान मुलांना व्यसनापासून परावृत्त करण्याचे काम करीत आहेत. या उपरोक्त विविध सामाजिक कार्यात त्या हिरिरीने भाग घेत असतात. नुकत्याच राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या वतीने अमोल ट्युशन क्लासेस च्या सभागृहात घेण्यात आलेल्या “ओबीसी महिलांचा सत्कार” कार्यक्रमात त्यांना हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय ओबीसी महिला महासंघाच्या विभागीय उपाध्यक्ष सौ भावनाताई वानखेडे होत्या. तर प्रमुख अतिथी म्हणून शहर अध्यक्षा श्रीमती सोनाली पुण्यपवार , गोंडवाना विद्यापीठाच्या सिनेट सदस्य प्रा. संध्या येलेकर, लायन्स क्लबच्या सचिव मंजुषा मोरे, सौ पुष्पाताई चापले मंचावर उपस्थित होत्या. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली.
या सत्कार कार्यक्रमात विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ओबीसी महिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यात १) सुरेखा प्रभाकर बारापात्रे २) सौ सुधा चौधरी ३)सौ पुष्पाताई करकाडे ४) सौ ज्योती दिलीप भोयर५) माजी नगरसेविका लता विजय मुरकुटे ६)सौ नीलिमा अनंता ठाकरे ७) कु देवला बानबले (शिक्षिका) ८) सौ आशाताई त्र्यंबक करोडकर (सेवानिवृत्त शिक्षिका) यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी पदावरुन बोलतांना सिनेट सदस्य प्रा संध्या येलेकर म्हणाल्या, आज इथे ज्या महिलांचा सत्कार झाला आहे त्यांना शिक्षणासाठी किंवा कुठल्यातरी पदावर जाण्यासाठी झटावे लागलं, आई-वडिलांचा विरोध पत्करावा लागला, काही त्यात यशस्वी झाल्यात तर काहींना मात्र शिक्षण मध्येच थांबवावं लागलं. परंतु राष्ट्रमाता जिजाऊ व क्रांतीज्योती सावित्रीबाईंची विचारांची प्रेरणा व जिद्द त्यांच्या मध्ये असल्यामुळे त्या इतर क्षेत्रात पुढे जाऊन कर्तुत्ववान ठरल्यात. प्रत्येकी मध्ये काहीना काही विशेष गुण असतात, ते फक्त दाखवायची संधी त्यांना मिळाली पाहिजे. एखादा कोणी जर त्यांच्या पाठीशी उभा राहिला तर त्या आपले ध्येय गाठू शकतात.असे मोलाचे मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष सौ भावना वानखेडे यांनी महिलांना पुढे नेण्यासाठी स्त्री पुरुष समानता असणे गरजेचे आहे तसेच आपल्या मुलाबाळांच्या भवितव्यासाठी राष्ट्रीय ओबीसी महासंघाने उभारलेल्या चळवळीत मोठ्या संख्येने सामील होण्याचे आव्हान त्यांनी याप्रसंगी केले. सर्व सत्कारमूर्ती यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे उपाध्यक्ष तथा डॉ. पंजाबराव देशमुख. रा. शि.प.चे कार्याध्यक्ष प्रा. शेषराव येलेकर यांनी तर आभार प्रदर्शन सोनाली पुण्यपवार यांनी केले. कार्यक्रमाला सौ रेखा चूधरी, सुवर्णा म्हशाखेत्री, विजया रडके सौ.के आर भोयर, सौ.ज्योती श्रीरामवार, संध्या शिवणकर, माला कुडे, गुंजन चापले, विमल भोयर, डी एन चापले, दादाजी चूधरी , सुरेश भांडेकर, चंद्रकांत शिवणकर, डॉ. दिलीप भोयर, त्र्यंबक करोडकर, प्रभाकर बारापात्रे, प्रफुल येलेकर सह समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.