आशा स्वंसेविकांचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद : माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे

116

– आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ गडचिरोलीच्या वतीने डॉक्टर्स व आशा स्वंसेविकांचा कोरोना योद्धा म्हणून सत्कार

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : कोविड-१९ काळामध्ये संपूर्ण जग ठप्प झालेले असताना पोलीस विभाग व आरोग्य विभागातील डॉक्टर्स,आरोग्य सेविका व खास करून आशा स्वंसेविकांनी आपल्या जीवाची पर्वा न करता मोलाचे कार्य केले. अशा आशा स्वंसेविकांचे कार्य प्रेरणादायी व कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन माजी नगराध्यक्ष योगिताताई पिपरे यांनी केले.
आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळ गडचिरोलीच्या वतीने ८ मार्च जागतिक महिला दिनानिमित्त स्थानिक पत्रकार भवन येथे गडचिरोली शहरातील डॉक्टर्स, २२ आशा स्वंसेसेवीका यांचा कोरोना योद्धा म्हणून प्रशस्तीपत्र, साडीचोळी, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.यावेळी अध्यक्ष स्थानावरून योगिताताई पिपरे बोलत होत्या.
यावेळी सत्कारमूर्ती म्हणून समाज सेविका तथा जिजामाता कृषिभूषण पुरस्कार प्राप्त प्रतिभाताई चौधरी, माजी जि. प. अध्यक्ष योगिताताई भांडेकर, डॉ. सीमाताई गेडाम, अमिर्झा येथील पर्यवेक्षिका नेहाताई समर्थ, सामाजिक परिचारिका किरणताई रघुवंशी यांचा सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.
सदर सत्कार कार्यक्रमाला माजी नगरसेविका वैष्णवीताई नैताम, लताताई लाटकर, अल्काताई पोहनकर, कविताताई उरकुडे, वर्षाताई शेडमाके, ज्योतीताई बागडे, पूनम हेमके, कोमल बारसागडे, शैलाताई कुनघाडकर, मृणाली मेश्राम, अंजली कोडापे, देवाजी लाटकर, राजेंद्र सहारे तसेच आशा स्वंसेवीका उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक आदर्श शिक्षण व सेवा प्रसारक मंडळाचे अध्यक्ष तथा माजी नगरसेवक प्रमोदजी पिपरे यांनी केले. सूत्रसंचालन रश्मीताई बाणमारे तर आभार वैष्णवी नैताम यांनी मानले.