जागतिक महिला दिनानिमित्त राकाँतर्फे गोकुळनगर येथे आरोग्य शिबिराचे आयोजन

128

– शेकडो महिला, पुरुषांनी घेतला आरोग्य शिबिराचा लाभ

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर गडचिरोली, महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर गडचिरोली तथा युवक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने राकाँँ गडचिरोली शहर अध्यक्ष तथा माजी नगरसेवक विजयभाऊ गोरडवार यांच्या नेतृत्वात आशीर्वाद सभागृह गोकुलनगर वॉर्ड क्रमांक 23 गडचिरोली येथे जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून आज, 8 मार्च रोजी भव्य आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात शेकडो महिला व पुरुषांनी आपल्या आरोग्याची तपासणी करून औषध व उपचाराचा लाभ घेतला. याप्रसंगी संध्याताई उईके माजी नगरसेविका तथा जिल्हा संघटन सचिव महिला राष्ट्रवादी पार्टी गडचिरोली, मिनलताई चिमुरकर माजी नगरसेविका तथा महिला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शहर अध्यक्ष गडचिरोली, आरती कोल्हे निरीक्षक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी महिला चामोर्शी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, तालुका महिला अध्यक्ष नीताताई बोबाटे, सुषमा येवले, रेखा सहारे, सुवर्णा पवार, नईमभाई शेख, भाष्कर निमजे, राजुभाऊ डांगेवार, सुनिलभाऊ कत्रोजवार, प्रसाद पवार, अमोल कुलमेथे, अमर खंडारे, मल्लयाजी कालवा, शेखर मडावी, दर्शन वालदे, कामसेन अंबादे, खेमदेव हस्ते, सरिता कोकोडे, सपना मरसकोल्हे आदी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते. सदर शिबिराला आरोग्य अधिकारी डॉ. दिनेश रोकडे, डॉ. शिल्पा कोहळे, डॉ. गौरव डोंगरे, डॉ. मीनाक्षी खोब्रागडे, डॉ. संदीपान सदावर्ते, डॉ. प्रज्ञा टेकाम, तसेच आरोग्य सेविका, लॅब टेक्निशीयन व औषध वितरक यांच्यासह आरोग्य पथक उपस्थित होते.