सशक्त राष्ट्रनिर्मितीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारधारेची गरज : शिवसेना सहसंपर्क प्रमुख अरविंदभाऊ कात्रटवार

67

– स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त गडचिरोली तालुक्यातील मौशीचक-कातखेडा येथे शेकडो माता-भगीनीना वस्त्र भेट

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांनी आधुनिक विचारधारा अंगिकारुन हिंदू धर्मात सुधारणा करण्यासाठी बुद्धी व विज्ञाननिष्ठा यांची कास धरुन लढा दिला. देशाला धार्मिक अज्ञानाच्या युगातून आजच्या सुधारलेल्या विज्ञान युगात आणून सोडणे हाच खरा धर्म असल्याचे मानले. सावरकरांचे विचार प्रेरणादायी होते. त्यांनी देशवासीयांमध्ये देशप्रेम जागृत केले. त्यांचे प्रेरणात्मक विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी आहेत, असे प्रतिपादन शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार यांनी केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्त गडचिरोली जिल्हा शिवसेनेच्या वतीने संपर्कप्रमुख किशोर पोतदार यांच्या मार्गदर्शनाखाली गडचिरोली तालुक्यातील मौशीचक-कातखेडा येथे माता भगिनींसाठी वस्त्रभेट कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते. मार्गदर्शन करताना अरविंदभाऊ कात्रटवार पुढे म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांनी जातीव्यवस्थेला थारा दिला नाही. मात्र हिंदूत्वासाठी त्यांचा लढा होता. त्यांनी अंधश्रद्धा, जातीभेद यावर कडाडून टिका केली. सर्वांना न्याय मिळावा आणि समता, बंधुत्वाचे राष्ट्र निर्माण होईल, यासाठी सावरकरांनी महत्वपूर्ण योगदान दिले. स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचाराची ज्योत तेवत ठेवून कार्य करण्याची गरज असल्याचे अरविंदभाऊ कात्रटवार म्हणाले. यांनतर मार्गदर्शन करताना शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप म्हणाले, स्वातंत्र्याच्या लढ्यात वीर सावरकरांचे मोठे योगदान आहे. इंग्रजांच्या हुकूमशाही विरोधात आवाज उठवून भारत मातेच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला. त्यांचे कार्य व विचार युवा पिढीसाठी प्रेरणा देणारे आहेत. शिवसेनेच्या वतीने वस्त्र भेट कार्यक्रमातून सामाजिक बंधीलकीचे दर्शन घडविले आहे असे सामाजिक कार्य फक्त शिवसेनाच करू शकते, असे भावोद्गार यावेळी अनेक माता भगिनिनी काढले. संपूर्ण मौशिचक- कातखेड़ा गांव यावेळी भगवामय झाले होते. या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित शिवसेना सहसंपर्क प्रमुख तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य अरविंदभाऊ कात्रटवार, शिवसेना सहसंपर्क प्रमुख विलास कोडाप, यादवजी लोहंबरे, नवनाथ ऊके, हरबाजी दाजगये, निरंजन लोहबरे, स्वप्नील ढोढरे, दिलीप भुरसे, संदीप अलबनकर, सूरज उइके, धनेश्वर सुरकर, निकेश लोहंबरे, राहुल सोरते, अरुण बरापात्रे, संजय शेंडे, स्वप्नील खांडरे, प्रशांत ठाकुर, तुषार बोरकर, जयंत मेश्राम, धानेश्वर लोहंबरे, अनिल कोसमशीले, हर्शेल रामटेके, प्रमोद आवारी, मुकरुजी कोहपरे, पुंडलिक चिंचोड़कर, प्रकाश बोरकर, चरण देशमुख, किशोर देशमुख, रमाकांत चिंचोड़कर, प्रकाश पुराते, मोहन सयाम, योगेश सालोटकर, उमाजी गावड़े, नामदेव सेलोटे, भावजी टेकाम, रेमजी ठाकरे, रामचंद्र ठाकरे, तानबा दाजयगे, महेश झोड़े, विलास दाजगये, रामचंद्र बहायल यांच्यासह गावातील माता भगिनी व गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.