– चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर व विष्णुनगर येथे शेतकऱ्यांची बैठक
विदर्भ क्रांती न्यूज
गडचिरोली : भारत देश जैव इंधन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण व्हावा हे देशाचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. अब्दुल कलाम यांच्या स्वयंपूर्तीसाठी शेतकऱ्यांनी सहकार्य करावे व जैव इंधन निर्मितीच्या प्रक्रियेत स्वयंपूर्तीने सहभागी व्हावे, असे आवाहन रामीबाई फार्मर प्रोड्युसर कंपनीचे संचालक तथा संस्थापक अध्यक्ष गोवर्धन चव्हाण यांनी केले.
रामीबाई फार्मर प्रोड्युसर कंपनी व एमसीएलच्या माध्यमाने सुरू करण्यात येत असलेल्या जैविक इंधन प्रकल्पाच्या सभासदांची नोंदणी करण्यासाठी चामोर्शी तालुक्यातील गौरीपूर व विष्णुनगर 28 फेब्रुवारी रोजी बैठक घेण्यात आली, त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
न्युपिअर गवतापासून बनविण्यात येणाऱ्या सीएनजी, एलपीजी गॅस बायोडिझेल, पेट्रोल, सेंद्रीय खत बनविण्याच्या प्रक्रियेबद्दल व कंपनीबद्दल शेतकऱ्यांना मार्गदर्शन करण्यात आले. हा प्रकल्प शेतकऱ्यांच्या आर्थिक विकासासाठी वरदान ठरणार आहे. तसेच पर्यावरण संतुलनासाठी, बेरोजगारी निर्मूलन व देशाला स्वावलंबी बनविण्यात मोलाची मदत ठरणार आहे, असेही चव्हाण यांनी सांगितले. या बैठकीला सरपंच मुखर्जी, माजी जि. प. सदस्य वासेकर, बंडू रामटेके, जि. आर. धोती यांच्यासह गावातील प्रतिष्ठित नागरिक व शेतकरी उपस्थित होते. चामोशी तालुक्यात 15 हजार शेतकरी सभासदांंचे उदिष्ट असूूून आतापर्यंत 10 हजार शेतकरी सभासदांची नोंदणी झाली आहे.