देशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात घालणारा अर्थसंकल्प : महेंद्र ब्राम्हणवाडे

96

विदर्भ क्रांती न्यूज

गडचिरोली : देशात महागाई ने आभाळ टेकले असताना सोबतच अवकाळी पाऊस, कोरोना महामारी या सर्व घटनांनी शेतकरी, सर्व सामान्य जनता व लघु व्यापाऱ्याचे कंबरडे मोडले आहेत. देशात बेरोजगारीचे दर उच्चांक गाठले आहे. अशा परिस्थितीत देशाचा अर्थसंकल्प सादर होत असताना या अर्थसंकल्पात सामान्य वर्गाला मोठी अपेक्षा होती. मात्र हे अर्थसंकल्प म्हणजे सर्वसामान्यांसाठी फक्त घोषणांचे बजेट ठरले असून देशाची संपत्ती मोठ्या उद्योग पतीच्या घशात टाकण्याचे काम केंद्रातील सरकार या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून करु पाहत आहे. सबका साथ सबका विकास या फक्त घोषणाच असून त्याचे प्रतिबिंब या अर्थसंकल्पात दिसत नाही. अमृत महोत्सववी वर्षात देशातील जनतेला अमृताचा अनुभव मिळेल असे बोलले जात होते. पण देशाची सद्याची आर्थिक स्थिती, सरकारने सादर केलेले आकडे, महागाई आणि सरकारे देशाची संपत्ती विकण्याचा लावलेला सपाटा पाहता देश प्रगतीकडून अधोगतिकडे जात असल्याचे दिसते. अर्थसंकल्पात नवीन काही नसून, फक्त शेतकरी कष्टकरी, लघु व्यापाऱ्यांना, बेरोजगार युवकांना निराशेत ठेवण्याचा काम केंद्रातील सरकारने केला आहे.